वरमाला घालण्यापूर्वी नवरदेवानं स्टेजवरच केली KISS ची डिमांड, अन् मग...; VIDEO VIRAL

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:13 PM2021-12-29T19:13:05+5:302021-12-29T19:14:21+5:30

या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

Groom asks bride for a kiss before wedding varmala ceremony video viral | वरमाला घालण्यापूर्वी नवरदेवानं स्टेजवरच केली KISS ची डिमांड, अन् मग...; VIDEO VIRAL

वरमाला घालण्यापूर्वी नवरदेवानं स्टेजवरच केली KISS ची डिमांड, अन् मग...; VIDEO VIRAL

googlenewsNext


सध्या सोशल मीडियावर एका वधू-वराचा अतिशय गोड व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिएमध्ये वराने वधूच्या गळ्यात वरमाला टाकण्यापूर्वी तिच्याकडे सर्वांसमोरच कीसची मागणी केली. वराने किसचा इशारा करताच, तसे उपस्थित असलेल्या सर्वांनींच त्याला दाद देत मोठ-मोठ्याने ओरडायला सुरुवात केली.

हा व्हिडिओ witty_wedding नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे, की वधू आणि वर दोघेही वरमाला कार्यक्रमासाठी स्टेजवर उभे आहेत. तेवढ्यात नवरदेव नवरीकडे इशारा करून किसची डिमांड करतो. यावर नवरी सुरुवातीला लाजते आणि नंतर प्रेमाने त्याच्या गालावर किस करते. यानंतर नवरदेवही तिच्या गळात तेवढ्याच प्रमाने वरमाला टाकतो. हे सर्व पाहून तेथील सर्व उपस्थित लोक टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंद करतात. 

सोशल मीडियावर हा सुंदर क्षण अनेक लोक पसंत करत आहेत. हा व्हिडिओ शेअर कर म्हटले आहे, की "एका ट्विस्ट सह माझी वरमाला. जेव्हा आपण आपल्या कॉलेजच्या काळातील प्रियकरासोबत लग्न करता."

या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. याशिवाय अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. "ये हुई ना बात," असे एका युजरने म्हटले आहे, तर "मीही माझ्या लग्नात असेच काहीतरी करणार होतो," असे एका दुसऱ्या युजरने म्हटले आहे. 
 

Web Title: Groom asks bride for a kiss before wedding varmala ceremony video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.