Video - "मी आपलं भविष्य...", सरकारी शाळेतील शिक्षिकेची बेरोजगार तरुणांना लग्नाची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:45 IST2025-11-27T15:44:25+5:302025-11-27T15:45:09+5:30
एका तरुणीला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली आहे आणि ती अशा तरुणाच्या शोधात आहे ज्याच्याकडे नोकरी नसली तरी चालेल.

Video - "मी आपलं भविष्य...", सरकारी शाळेतील शिक्षिकेची बेरोजगार तरुणांना लग्नाची ऑफर
लग्नासाठी चांगली नोकरी असणं अत्यंत आवश्यक असतं. नोकरी नसेल तर हल्ली मुली आणि तिच्या घरचे लग्नाला नकार देतात. अशातच एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामुळे बेरोजगार मुलांचा आनंद गगनाला भिडला आहे. एका तरुणीला नुकतीच सरकारी नोकरी मिळाली आहे आणि ती अशा तरुणाच्या शोधात आहे ज्याच्याकडे नोकरी नसली तरी चालेल. कारण तिने त्यांचं भविष्य सुरक्षित केलं आहे.
सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, नुकतीच सरकारी शिक्षिका झालेली तरुणी म्हणते, "मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. माझं नाव प्रीती आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे की, तुमच्यापैकी कोणाची तरी एकाची मी होणारी बायको असणार आहे, तुमची बायको आता सरकारी नोकरी करणार आहे."
"सरकारी शाळेमध्ये शिक्षिकेची पोस्ट मिळाली आहे. मला माझ्या भावी पतीला हा मेसेज द्यायचा आहे की, तू आरामात काम कर, तुला जे काही हवं ते सर्व कर, कारण मी आपलं भविष्य सुरक्षित केलं आहे." मुलीने हे सांगितल्यानंतर, कमेंट सेक्शनमधील बेरोजगार तरुणांना फारच आनंद झाला आहे. हा व्हिडीओ तरुणांमध्ये अत्यंत वेगाने व्हायरल होत आहे.
तरुणीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांनीच विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहे. काही युजरने ही आपली पत्नी, बायको सापडली असं म्हटलं आहे. तर काहींनी ज्याला कोणाला ही तरुणी पत्नी म्हणून भेटेल तो भाग्यवान असेल असं म्हटलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे.