अहो काका, तिथं मंत्रालय लिहिलंय मूत्रालय नाही; उघड्यावर लघवी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:11 IST2025-04-09T17:06:50+5:302025-04-09T17:11:38+5:30
उघड्यावर लघवी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अहो काका, तिथं मंत्रालय लिहिलंय मूत्रालय नाही; उघड्यावर लघवी करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल, याचा काही नेम नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती पृथ्वी विज्ञान मंत्रालय असे लिहिलेल्या भिंतीवर लघवी करताना दिसत आहे. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येत आहेत.
No civic sense then they blame the government pic.twitter.com/64ZGrtg7rb
— desi mojito 🇮🇳 (@desimojito) April 8, 2025
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उघड्यावर लघवी करताना दिसत आहे. तो व्यक्ती ज्या भिंतीवर लघवी करत आहे, त्या भिंतीवर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा बोर्ड आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हे पाहिले आणि आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला. व्हायरल होत असलेला व्हिडिओ अवघ्या ६ सेकंदाचा आहे, ज्यात व्हिडिओ बनवणारी व्यक्ती संबंधित व्यक्तीला तिथे लघवी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती त्याला हाक मारते आणि तिथे मंत्रालय लिहिले आहे, मूत्रालय नाही, असे सांगत असल्याचे ऐकू येत आहे. हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याचा दावा केला जात आहे.
@desimojito या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, कुठे कसे वागायचे समजत नाही आणि सरकारला दोष देतात. हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले आहे की, लाज वाटली पाहिजे आणि अशा लोकांकडून मोठा दंड आकारला पाहिजे. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, अशा लोकांना १ लाख रुपये दंड ठोठावा. तर, अनेक लोका हा गुन्हा असल्याचे म्हटले आहे.