कपलचा रोमॅन्टीक फोटो व्हायरल; पण नेटकऱ्यांची कौतुकासोबत टीकेची झोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 15:34 IST2019-03-05T15:33:21+5:302019-03-05T15:34:14+5:30

सध्या प्रिवेडिंग किंवा पोस्टवेडिंग फोटोशूटची क्रेझ असून आपल्या सोयीनुसार अनेक कपल्स फोटोशूट करत असतात. काही कपल्स तर एखादी थीम घेऊन फोटोशूट करत असतात.

This couple slammed for irresponsible train photoshoot pics goes viral | कपलचा रोमॅन्टीक फोटो व्हायरल; पण नेटकऱ्यांची कौतुकासोबत टीकेची झोड

कपलचा रोमॅन्टीक फोटो व्हायरल; पण नेटकऱ्यांची कौतुकासोबत टीकेची झोड

सध्या प्रिवेडिंग किंवा पोस्टवेडिंग फोटोशूटची क्रेझ असून आपल्या सोयीनुसार अनेक कपल्स फोटोशूट करत असतात. काही कपल्स तर एखादी थिम घेऊन फोटोशूट करत असतात. सध्या अशाच एका कपल्सचा फोटोशूटचा एक फोटो व्हायरल होत असून त्यावर सध्या सोशल मीडियावर फार चर्चा होताना दिसत आहेत. खरं तर हा फोटो पाहताच क्षणी रोमॅन्टीक फोटो वाटतो. पण जर तुम्ही नीट निरखून पाहिलतं तर तुमच्या लक्षात येइल की, काहीतरी वेगळं आहे. खरं तर वेगळं म्हणजे, या फोटोमधून त्यांचं बेजबाबदार वागणं दिसून येतं. या फोटोला आतापर्यंत 43 हजारपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत पण नेटकऱ्यांनी फार क्रिटिसाइजही केलं आहे. 

पोस्ट केली इन्स्टावर शेअर

कपलने हा फोटो इन्स्टाग्राम अकाउंट explorerssaurus वर शेअर केला आहे. या फोटोच्या कमेन्ट सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही पाहिलतं तर लोकांनी या फोटोवर टिकाही केलेली आहे. हा फोटो श्रीलंकेमधील एका चालत्या ट्रेनमधून काढला आहे. 

कपल रोमॅन्टीक फोटोशूटसाठी प्रसिद्ध

या फोटोमधील कपल सोशल मीडियावर फेमस असून इन्स्टाग्रामवर त्यांचे 2 लाख 43 हजार फॉलोअर्स आहेत. RAQUEL आणि MIGUEL अशी यांची नावं आहेत. 

ट्रॅव्हलशीसंबंधित करतात पोस्ट

हे कपल आपल्या प्रत्येक पोस्टमध्ये ट्रॅव्हलशी निगडीत रोमॅन्टिक फोटो आणि किस्से शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक फोटोमध्ये ट्रॅव्हल आणि त्यासंदर्भात काहीना काही पोस्ट करत असतात. 

भारतातही आले होते

हे कपल भारतातही येऊन गेलं असून त्यांनी जयपूरमधील हवा महलाचे फोटो शेअर केले आहेत. या कपलचे फोटो फार रोमॅन्टिक असतात. 

ताजमहालाचे फोटो

फक्त फोटोच नाही तर हे कपल आपल्या फोटोसोबत एक शॉर्ट व्हिडीओदेखील शेअर करतात. हे दोघेही ट्रॅव्हल करत असतात आणि रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात. 

Web Title: This couple slammed for irresponsible train photoshoot pics goes viral