जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:01 IST2025-07-14T18:00:33+5:302025-07-14T18:01:44+5:30
संबंधित चोर जीममध्ये चोरीच्या उद्देशाने शिरला होता. त्याने इकडे तिकडे बघून संधी मिळताच जीमचे काही साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील जिम ट्रेनरने त्याला रंगेहाथ पकडले.

जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
सोशल मीडियावर सातत्यान नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ एका चोराचा आहे. जो जीममध्ये चोरी करण्यासाठी शिरला होता. मात्र तेथे त्याच्यावर वजन उचलण्याची वेळ आली. संबंधित चोराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी, तेथील जीम ट्रेनरने त्याच्याकडून एवढी एक्सरसाईज करवून घेतली की, हा चोर पुन्हा कधी जन्मात चोरीचा विचारही मनात आणणार नाही.
जिममध्ये चोरी करण्यासाठी आला होता चोर -
संबंधित चोर जीममध्ये चोरीच्या उद्देशाने शिरला होता. त्याने इकडे तिकडे बघून संधी मिळताच जीमचे काही साहित्य चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील जिम ट्रेनरने त्याला रंगेहाथ पकडले. आणि त्याला जिममध्येच 'वर्कआउट शिक्षा' दिला.
जिम ट्रेनरने त्याला सर्वप्रथम पुश-अप मारायला सांगितले. नंतर त्याच्याकडून वेटलिफ्टिंग करून घेतली. स्क्वॅट्स आणि प्लँक्ससारखे थकवणारे व्यायाम करून घेतले. यासर्व प्रकारादरम्यान, चोर वारंवार खाली पडत होता, मात्र तो पूर्णपणे थकेपर्यंत ट्रेनरने त्याला सोडले नाही. अखेर त्याने "मला माफ करा! मी पुन्हा चोरी करणार नाही!" अशी गया वया करायला सुरुवात केली. नंतर त्याला सोडण्यात आले.
संबंधित चोर ट्रेनरच्या पायात पडत आणि मोठ्याने रडत माफी मागू लागला होता. जिम ट्रेनरने संपूर्ण घटना त्याच्या कॅमेऱ्यात कैत केली आहे. एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हडिओवर सोशल मीडिया युजर्सच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.
Thief Forced to Exercise After Being Caught in Cox's Bazar Gym
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 12, 2025
pic.twitter.com/iaPhNJmRcC
हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लाखो लोकांनी बघितला आहे. तसेच अनेक लोकांनी या व्हडिओला लाइकही दिले आह. याशिवाय युजर्स यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रियाही देत आहेत.