सापाला दोरीसारखा खेचत मंदिरात घेऊन गेला लहान मुलगा, बघून भक्तांची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 10:19 AM2023-02-22T10:19:54+5:302023-02-22T10:21:46+5:30

एका लहान मुलाने एका सापाला दोरीसारखं खेचत आणलं. ते बघून लोकांची हालत खराब झाली. सोशल मीडियावर या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Child entered the temple by holding a snake like a rope people shocked | सापाला दोरीसारखा खेचत मंदिरात घेऊन गेला लहान मुलगा, बघून भक्तांची बोलती बंद

सापाला दोरीसारखा खेचत मंदिरात घेऊन गेला लहान मुलगा, बघून भक्तांची बोलती बंद

googlenewsNext

साप एक जीव आहे ज्याला भल्याभल्यांना घाम फुटतो. लोक नेहमीच सापांपासून चार हात दूरच राहतात. कुणाला हेच वाटत असतं की, त्यांचा सापाशी सामना होऊ नये. अशात त्याला घरात आणणं, हाती घेणं किंवा पकडणं याचा लोक विचारही करत नाहीत. पण एका लहान मुलाने एका सापाला दोरीसारखं खेचत आणलं. ते बघून लोकांची हालत खराब झाली. सोशल मीडियावर या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

इंस्टाग्रामवर aviral_shukla5566 नावाच्या अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात एक लहान मुलगा सापाला असा फिरवत होता जणू तो दोरी असावा किंवा एखादं खेळणं असावं. सापाची शेपटी धरून तो मंदिरात शिरतो. तिथे पूजा करत असलेले लोक हा नजारा बघून घाबरतात. 

व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, एक मुलगा सापाची शेपटी धरून त्याच्यासोबत खेळत आहे. तो सापाला खेळण्यासारखं फिरवत आहे. इतकंच नाही तर तो सापाला खेचत मंदिरात घेऊन गेला. तेव्हा सगळ्यांना घाम फुटला.

हा व्हिडीओ घाबरवणारा आहेच. पण यावरील लोकांच्या कमेंट्समुळे मजेदार झाला आहे. मुलाला सापासोबत आत पाहिल्यावर सगळेच त्याला बाहेर जाण्याचा इशारा करताना दिसत आहेत. सगळेच त्याच्यापासून दूर उभे आहेत. अशात एक व्यक्ती येतो आणि मुलाचा हात धरून त्याला बाहेर घेऊन जातो. पण मुलगा सापाची शेपटी काही सोडत नाही. लोकांनी या मुलाला महादेवाचा भक्त म्हटलं आहे.
 

Web Title: Child entered the temple by holding a snake like a rope people shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.