या फोटोत दडलेल्या ब्रॅण्ड्सची संख्या किती? शोधून शोधून थकाल; बघा जमतंय का हे चॅलेन्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:15 PM2020-08-24T12:15:40+5:302020-08-24T12:23:37+5:30

पहिल्यांदा पाहिल्यानंतर अमूलची क्यूट गर्ल सगळ्यांच्या दृष्टीस पडते. पण जसजसं तुम्ही हा फोटो बारकाईनं पाहाल तसतसं तुम्हाला अनेक ब्रॅण्ड्सची चिन्ह दिसून येतील. 

Can you identify all the brands in the viral pic | या फोटोत दडलेल्या ब्रॅण्ड्सची संख्या किती? शोधून शोधून थकाल; बघा जमतंय का हे चॅलेन्ज

या फोटोत दडलेल्या ब्रॅण्ड्सची संख्या किती? शोधून शोधून थकाल; बघा जमतंय का हे चॅलेन्ज

Next

घरी बसून तुम्हाला  जर खूप कंटाळा आला असेल तर आज आम्ही तुम्हाला एक भन्नाट फोटो दाखवणार आहोत.   आपल्या रोजच्या वापरात असलेल्या वस्तूंच्या पदार्थांच्या वेगवेगळे ब्रॅण्ड्स या फोटोत लपलेले आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोला खूप प्रतिसाद दिला आहे. पहिल्यांदा पाहिल्यानंतर अमूलची क्यूट गर्ल सगळ्यांच्या दृष्टीस पडते. पण जसजसं तुम्ही हा फोटो बारकाईनं पाहाल तसतसं तुम्हाला अनेक ब्रॅण्ड्सची चिन्ह दिसून येतील. 

कमीत कमी वेळात तुम्हाला या फोटोतील बॅण्ड्सची नाव आणि संख्या सांगायची आहे. आयपीएस दिपांशू काबरा यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्ही या फोटोतील ब्रॅण्ड्स ओळखू शकता का असं कॅप्शन या फोटोला दिलं आहे. कोण जास्तीत जास्त ब्रॅण्ड्स शोधून दाखवणार याचे चॅलेन्ज दिलं आहे. या फोटोला आतापर्यंत २५ रिट्विट्स आणि २५० लाईक्स मिळाले आहेत. 

काही युजर्सनी ब्रॅण्ड्सची लाबंलचक लिस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तुम्हीसुद्धा  ट्राय करून पाहू शकता. इंस्टाग्रामवर ४२ हजार फॉलोअर्स असलेल्या एका सोशल मीडिया युजरनं हा फोटो शेअर केला होता. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.  या चॅलेन्जचं  योग्य उत्तर देण्यासाठी तुम्हाला चांगलंच डोकं चालवावं लागणार आहे. 

हे पण वाचा-

अरे व्वा! लोकांनी टाकून दिलेल्या मास्कपासून लाखो रुपयांच्या वीटा तयार करतो 'हा' अवलिया

याला म्हणतात देशभक्ती! भिक्षा मागणाऱ्या बाबांनी कोरोना रुग्णांसाठी दिले ९० हजार दान

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

Web Title: Can you identify all the brands in the viral pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.