सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:32 PM2020-08-18T12:32:05+5:302020-08-18T12:34:16+5:30

सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Delhi police jawan is doing duty without shoes winning hearts on twitter | सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

Next

कोणताही ऋतू, कोणताही सण उत्सव असो पोलिसांना आपल्या कर्तव्यावर हजर राहवं लागतं. त्याप्रमाणेच ट्रॅफिक पोलीससुद्धा  दिवसरात्र मेहनत करून  वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी झटत असतात. सध्या सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

हा फोटो CPDilhi यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं आहे की,'' मी कर्तव्यनिष्ठता आणि आत्मसन्मान यांचा आदर करतो. भर पावसातही गजबजलेल्या रस्त्यावर अनवाणी एका पायावर उभं राहून आपले कर्तव्य पूर्ण करत आहेत. अशा पोलीस कर्मचारीवर्गामुळे दिल्ली पोलीस अग्रेरस आहेत.आपल्या कर्तव्यावर असणारा हा पोलीस कौतुकास पात्र आहे'' असंही त्यांनी म्हटलं आहे. 

सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पोलिसांप्रती असलेली आदरभावना व्यक्त केली आहे. या फोटोला आतापर्यंत २ हजारांच्यावर लाईक्स आणि ३०० पेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले आहेत. १०० पेक्षा जास्त कमेंट्स या फोटोला मिळाल्या आहेत.

याआधीसुद्धा पोलीसाचा एक फोटो व्हायरल झाला होता. भर पावसाच्या पाण्यात एक रिक्षा अडकलेली असताना पोलिसाने या माणसाची मदत केली. पाण्याचे प्रमाण वाढल्याने या रिक्षाचा तोल जात होता. त्याचवेळी पोलिसाने या रिक्षावाल्याला मदतीचा हात दिल होता. तुम्हाला या फोटोमध्ये दिसून  येईल प्रचंड जोर लावून  खाकी वर्दीतील देवमाणूस रिक्षाला पडण्यापासून वाचवत आहे.  सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला होता.

Image

हा फोटो ट्विटरवर अनिज्ञा चट्टोपाध्याय  यांनी शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन दिलं होतं की भर पावसात एक पोलिस कॉन्स्टेबल रिक्षा चालकाच्या मदतीला धावला. या फोटोला चार हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि  २०० पेक्षा जास्त रिट्विटस मिळाले होते.  लोकांनी या फोटोवर भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला होता. कोरोनाकाळातील पोलीसांचे कार्य उल्लेखनीय होते. या फोटोने लोकांची मनं जिंकून घेतली होती.

हे पण वाचा-

दिलदार मित्र! केवळ पक्ष्यांना खाण्यासाठी म्हणून अर्धा एकर जमिनीवर पिक घेणारा शेतकरी!

कौतुकास्पद! हजारो प्राण्यांना जीवनदान देणाऱ्या 'रसिला वाढेर'!!

सर्वात विषारी सापाने एकाच वेळी दिला ३३ पिल्लांना जन्म, फोटो झालेत व्हायरल

कडक सॅल्यूट! अंगावरची साडी काढून 'ती'नं पाण्यात बुडणाऱ्या तरूणांना जीवदान दिलं

Web Title: Delhi police jawan is doing duty without shoes winning hearts on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.