Can you count the number of parakeets on this tree | या झाडावर बसलेल्या पोपटांची संख्या किती? मोजून मोजून थकाल; चॅलेन्ज घेऊनच दाखवा

या झाडावर बसलेल्या पोपटांची संख्या किती? मोजून मोजून थकाल; चॅलेन्ज घेऊनच दाखवा

गेल्या काही महिन्यांपासून प्राण्याचे आणि पक्ष्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. असाच एक गमतीदार फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या फोटोतील झाडावर अनेक पोपट बसले आहेत. पोपटांची संख्या तुम्हाला सांगायची आहे. अनेकजण  पोपटांची संख्या मोजून मोजून थकले आहेत. तर काहींनी पोपटांची योग्य संख्या सांगितली आहे.  कमीतकमी वेळात तुम्हाला या झाडावरील पोपटांची संख्या शोधून दाखवायची आहे. 

हा फोटो ट्वीटरवर @WildLense_India या युजरने शेअर केला आहे. प्रयत्न करून पोपटांची संख्या सांगितल्यास पहिल्या पाच योग्य उत्तरांना बक्षिससुद्धा दिलं जाणार आहे. या फोटोंना कॅप्शन लिहिले आहे की, तुम्हाला या फोटोतील पोपटांची संख्या सांगायची आहे. पहिल्या पाच उत्तरांना बक्षिस देण्यात येईल.


सोशल मीडिया युजर्सनी या फोटोला तुफान प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी पोपटांची योग्य संख्या सांगितली आहे. तुम्ही सुद्धा लॉकडाऊनमध्ये वेळ जात नसेल तर पोपटांची संख्या मोजून आपला वेळ घालवू शकता. या निमित्ताने पोपटांची योग्य संख्या शोधण्यात तुमच्या डोळ्यांचा व्यायामसुद्धा होईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Can you count the number of parakeets on this tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.