बॉडी दाखवून मुलींसोबत करत होता प्रँक, सुरुवातील आली मजा मग भोगावी लागली सजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:56 IST2021-08-13T13:29:28+5:302021-08-13T13:56:09+5:30

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या एक तरुण चर्चेत येण्यासाठी प्रँक करत असल्याचे दिसतेय. यामध्ये तो तरुणींना भीती घालत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे...

boy doing prank by removing his gym vest and scaring girls, video goes viral | बॉडी दाखवून मुलींसोबत करत होता प्रँक, सुरुवातील आली मजा मग भोगावी लागली सजा

बॉडी दाखवून मुलींसोबत करत होता प्रँक, सुरुवातील आली मजा मग भोगावी लागली सजा

सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही. सध्या एक तरुण चर्चेत येण्यासाठी प्रँक करत असल्याचे दिसतेय. यामध्ये तो तरुणींना भीती घालत आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. मात्र, प्रँकच्या शेवटी त्याचा पंगा एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी पडला आहे. त्यानंतर मात्र, हा तरुण चांगलाच घाबरला आहे.

व्हिडीओमध्ये दिसतं त्याप्रमाणे एक तरुण लिफ्टमध्ये उभा आहे. लिफ्टमध्ये असताना समोर तरुणी दिसताच तो घातलेलं जिमवेस्ट काढून फेकत आहे. तसेच नंतर रागात येऊन तो तरुणींकडे जात आहे. हा सर्व प्रकार पाहून तरुणी त्याला चांगल्याच घाबरत आहेत. मात्र या तरुणाची नंतर एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी गाठ पडली आहे. 

तरुणाने सुरुवातीला महिला पोलीस अधिकाऱ्यासमोर आपली जीमवेस्ट काढली आहे. तसेच हा तरुण नंतर महिला पोलीस अधिकाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जवळ जाताच खोड काढत असेलेली तरुणी ही एक महिला पोलीस अधिकारी असल्याचे त्याला समजले आहे. नंतर मात्र तो चांगलाच घाबरला आहे.

हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. jatt_planet या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नेटकरी या तरुणाला महिला पोलीस अधिकाऱ्याने चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी करत आहेत.

Web Title: boy doing prank by removing his gym vest and scaring girls, video goes viral