जिया हो बिहार के लाला! सायकलवर बसुन भर रस्त्यात करतायत दाढी, बिहारी बाबुंचा स्वॅगच न्यारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 16:37 IST2021-09-17T16:37:05+5:302021-09-17T16:37:17+5:30
एक देसी जुगाड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मुख्य म्हणजे हा देसी जुगाड बिहारमधला आहे. यातील दोन बिहारी लालांचा स्वॅग पाहुन तुम्ही टाळ्याच वाजवाल...

जिया हो बिहार के लाला! सायकलवर बसुन भर रस्त्यात करतायत दाढी, बिहारी बाबुंचा स्वॅगच न्यारा
आपल्या देशात अशी एकापेक्षा एक मंडळी भेटतात जी जुगाड करण्यात माहिर असतात. अनेक देसी जुगाड असे असतात ज्याचे व्हिडिओ पाहुन लोकांचं भरपूर मनोरंजन होतं. असाच एक देसी जुगाड सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय. मुख्य म्हणजे हा देसी जुगाड बिहारमधला आहे. यातील दोन बिहारी लालांचा स्वॅग पाहुन तुम्ही टाळ्याच वाजवाल...
व्हायरल होत असलेला व्हिडीओ बिहार येथील आहे. व्हिडीओमध्ये एक बार्बर भर रस्त्यात सायकलवर बसून समोर बसलेल्या माणसाची दाढी करतोय. विशेष म्हणजे बार्बर आणि माणूस असे दोघेही सायकलवर निवांत बसले आहेत. बार्बर अगदी मजेत काम करत आहे. तर माणूसही शांतपणे उभा राहून दाढी करण्यासाठी थांबला आहे. हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसत आहेत.
या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर beauty_of_patna या अकाऊंटवर पाहता येईल. व्हिडीओसोबत मजेदार कॅप्शन देण्यात आलंय. “हे बिहार आहे. येथे काहीही अशक्य नाही,” असं कॅप्शनमध्ये म्हटलंय. व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स तर भन्नाट आहेत.