शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:कॉंग्रेस मुख्यालयात सापडले भाजपचे झेंडे; कार्यकर्त्यांमध्ये उडाली एकच खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 14:44 IST

कॉंग्रेसच्या मुख्यालयात असलेल्या भाजपाच्या झेंड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

लखनौ : भारताच्या राजकारणातील दोन राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय कॉंग्रेस यांच्यामधील राजकीय मतभेद जगजाहीर आहेत. मात्र लखनौमधील यूपी कॉंग्रेसच्या राज्य मुख्यालयातील एक व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. कारण लखनौमधील यूपी कॉंग्रेसच्या मुख्यालयात चक्क भाजपाचे झेंडे सापडले आहेत. स्थानिक नेत्यांनी याबाबत प्रत्यक्षपणे प्रतिक्रिया देण्यास टाळले. प्रदेश कार्यालयात सत्ताधारी पक्षाचे झेंडे आढळल्याने कॉंग्रेसच्या गोट्यात एकच खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, कॉंग्रेसच्या मुख्यालयात असलेल्या भाजपाच्या झेंड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मॉल एव्हेन्यूवर येथ असलेल्या प्रदेश कॉंग्रेसच्या दुमजली मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावर सोशल मीडियाचे कार्यालय आहे. हा व्हिडीओ कॉंग्रेसचे माजी नेते झीशार हैदर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आजूबाजूला असल्याचे पाहायला मिळत आहेत. मात्र आश्चर्यचकित झालेल्या कार्यकर्त्यांना देखील हे झेंडे पाहून धक्का बसला आहे. 

कॉंग्रेस मुख्यालयात सापडले भाजपचे झेंडेकॉंग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अशोक सिंग यांनी सांगितले की, ते पाच दिवसांनंतर लखनऊमध्ये पोहचले असून त्यांना शनिवारी संध्याकाळी या प्रकरणाची माहिती मिळाली. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तर बीजेपी कडून सांगितले जात आहे की, "ज्यांच्याकडे प्रदेश कार्यालयाचा कार्यभार आहे त्यांना ही दृश्ये पाहून याचा काहीच धक्का बसला नाही किंवा आश्चर्य वाटले नाही. या घटनेवरून काँग्रेसच्या स्थितीचे आकलन होऊ शकते." 

कार्यकर्त्यांमध्ये उडाली एकच खळबळ लक्षणीय बाब म्हणजे "या घटनेचा कोणताही गाजावाजा होताना दिसत नाही. तसेच या घटनेबाबत काँग्रेस कार्यालयातील एकही पदाधिकारी बोलण्यास तयार नव्हता. एका तरूण नेत्याने सांगितले की, "आम्ही या घटनेची सखोल चौकशी करत आहोत. काही अज्ञात लोकांनी या माध्यमातून बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. " सोशल मीडियाचे हे कार्यालय आधी युवा कॉंग्रेसचे मुख्यालय होते. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलcongressकाँग्रेसBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश