हे रे देवा काय! नवरदेवाचे नवरीपेक्षा भारी नखरे, नेटकरी म्हणतायत याचं जबरदस्तीने लग्न लावलंय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 12:08 IST2021-10-04T12:08:33+5:302021-10-04T12:08:43+5:30

सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडिओ  व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. नवरदेवाचे हे नखरे बघुन याला काय झालंय असा प्रश्न तुम्हाला पडेल...

angry groom on bride video goes viral on social media | हे रे देवा काय! नवरदेवाचे नवरीपेक्षा भारी नखरे, नेटकरी म्हणतायत याचं जबरदस्तीने लग्न लावलंय

हे रे देवा काय! नवरदेवाचे नवरीपेक्षा भारी नखरे, नेटकरी म्हणतायत याचं जबरदस्तीने लग्न लावलंय

लग्नात जास्त नखरे नवरीचे असतात असा साधारण समज आहे. मुलींचा मेकअप त्यांचा ड्रेस यावरुन त्यांच्या खुप आवडीनिवडी असतात. पण सध्या सोशल मीडियावर एका नवरदेवाचा व्हिडिओ  व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही बुचकळ्यात पडाल. नवरदेवाचे हे नखरे बघुन याला काय झालंय असा प्रश्न तुम्हाला पडेल...

व्हायरल होणारा या व्हिडिओमध्ये नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा असल्याचं दिसतं. नवरदेवाचे हावभाव बघून जाणवतं की तो कोणत्या तरी गोष्टीवरुन रुसला आहे. नवरी त्याला मनवण्याचा पूर्ण प्रयत्न करते, मात्र नवरदेव नखरे दाखवतच राहतो. तुम्ही पाहू शकता, की नवरी स्टेजवर नवरदेवाला मिठाई खाऊ घालण्याचा प्रयत्न करते. मात्र, नवरदेव मिठाई खात नाही. तो वारंवार आपलं तोंड इकडे तिकडे फिरवत राहतो. या दरम्यान नवरीचे हावभाव पाहून समजतं की तिला नक्की काय वाटतंय.

काहीच सेकंदाचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ekmohabbataisibhi नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. हा व्हिडिओ १३ हजारहून अधिकांनी लाईक केला आहे. लोकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, याचं जबरदस्तीनं लग्न होत आहे. दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं, बहुतेक तो गुटखा खातोय, त्यामुळेच तोंड उघडू शकत नाही.

Web Title: angry groom on bride video goes viral on social media