शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:07 IST

Christmas Tree Hairstyle Viral Video: ही हेअरस्टाईल करणं एकदमच सोपं आहे, कशी... समजून घ्या

Christmas Tree Hairstyle Viral Video: एखाद्या व्यक्तीचा लूक बदलण्यात हेअरस्टाईल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. म्हणूनच लोक सतत त्यांच्या केसांवर विविध प्रयोग करत असतात. कुणी कधीतरी ट्रेंडी कट करतात, तर कधी वेगळ्या प्रकारचे हेअर एक्स्टेंशन लावतात. अनेकदा सण-उत्सवाच्या लूकसाठी खास हेअरस्टाईल केली जाते. पण अलीकडेच सोशल मीडियावर समोर आलेला एक व्हिडिओ खूपच आगळावेगळा आहे. त्यामुळेच त्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले असून, तो व्हायरल झालाय.

ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल

एका इंस्टाग्राम पेजने एका हेअरस्टाईलचा व्हिडीओ पोस्ट केलाय ज्याने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. या व्हिडिओमध्ये एक अनोखी ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल दाखवण्यात आली आहे. या अनोख्या हेअरस्टाईलसाठी मुलीने एका साध्या बाटलीचा वापर केला. तिने बाटली केसांच्या मध्यभागी ठेवली, जेणेकरून केसांना उंची मिळेल. नंतर केस बाटलीभोवती गुंडाळले आणि ख्रिसमस ट्री तयार केली. केसांचा बेसिक आकार पूर्ण झाल्यावर, तिने केसांभोवती हिरवी झालर गुंडाळली आणि मग ख्रिसमस ट्री सजवली. पाहा व्हिडीओ-

नेटकरी पोट धरून हसले...

लोक या संपूर्ण प्रक्रियेवर हसताना दिसले. व्हिडिओ व्हायरल होताच, कमेंट सेक्शनमध्ये मजेदार प्रतिक्रिया आल्या. एका युजरने मजेत मुलीला 'ख्रिसमस ट्री' ऐवजी 'ख्रिसमस स्त्री' म्हटले. तर दुसऱ्याने लिहिले की ख्रिसमसला आता 'हेअरमस' म्हटले पाहिजे. लोकांनी मजेदार कमेंट केले असले तरीही व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Viral: Girl's Christmas tree hairstyle amuses netizens, sparks hilarious reactions.

Web Summary : A girl's unique Christmas tree hairstyle video went viral. Using a bottle for height, she wrapped hair, added green garland, and decorations. Netizens reacted hilariously, calling her 'Christmas Woman' and suggesting 'Hairmas' instead of Christmas.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाViral Videoव्हायरल व्हिडिओChristmasनाताळ