तुझ्या जिद्दीला सलाम! एका पायाने अपंग तरीही सायकल चालवत करतो कित्येक किलोमीटरचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 15:39 IST2021-10-12T15:38:29+5:302021-10-12T15:39:31+5:30
शारिरीक व्याधी असतील तरी त्या इच्छाशक्तीपुढे हार मानतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की, आपल्यापुढं असलेली संकटं किती छोटी आहेत.

तुझ्या जिद्दीला सलाम! एका पायाने अपंग तरीही सायकल चालवत करतो कित्येक किलोमीटरचा प्रवास
जगात एखादी गोष्ट करण्याची इच्छा बाळगली, त्यासाठी अपार कष्ट घेतले तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. मग त्यात अगदी शारिरीक व्याधी असतील तरी त्या इच्छाशक्तीपुढे हार मानतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच वाटेल की, आपल्यापुढं असलेली संकटं किती छोटी आहेत.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती एका पायाने सायकल चालवत आहे, तर दुसऱ्या पॅडलवर त्याने काठी ठेवली आहे आणि हाताने तो पॅडल मारत आहे. या व्यक्तीचं नाव आहे नरेश. एक पाय असूनही नरेशची सायकल सुसाट धावते, आणि कुठल्याही दुचाकीलाही टक्कर देते. नरेश एक मजूर आहे, घरापासून कित्येक किलोमीटरवर असणाऱ्या कंपनीत तो रोज असाच सायकलवर जातो. तिथं ९ तासाची शिफ्ट करतो आणि पुन्हा अशीच सायकल चालवत घरापर्यंत पोहचतो.
“NEVER GIVE UP” pic.twitter.com/z6Cpw86c9q
— Awanish Sharan (@AwanishSharan) October 9, 2021
हा व्हिडीओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या @AwanishSharan या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, कधीही हार मानू नका, बातमी लिहली जाईपर्यंत हा व्हिडीओ५८ हजार लोकांनी पाहिला होता. नरेशचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण प्रभावीत झाले आहेत. अनेकांनी नरेशच्या जिद्दीला सलाम केला आहे आणि आयुष्याकडे कायम हसऱ्या नजरेने पाहणाऱ्या आणि त्यातील प्रत्येक क्षण जगणाऱ्या नरेशकडून प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला जात आहे.