शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर गुणपत्रकाविना!

By admin | Updated: July 22, 2015 23:56 IST

विद्यापीठाची अनागोंदी : परीक्षेत उत्तीर्ण होऊनही वर्ष वाया

चिपळूण : मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराचा फटका डीबीजे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. २०१४मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने त्यांना नोकरीसाठी प्रयत्ना करता आले नाहीत, किंवा इतर ठिकाणी प्रवेशही घेता आला नाही. त्यामुळे त्यांची ससेहोलपट सुरु आहे. मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेल्या ऐश्वर्या पेंडसे व इतर ५३ विद्यार्थ्यांची गुणपत्रके न मिळाल्याने त्यांना इतर ठिकाणी प्रवेश घेता आला नाही किंवा त्यांना नोकरीसाठी प्रयत्नही करता आले नाहीत. त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांनी सातत्याने महाविद्यालयाकडे संपर्क साधला व चौकशी केली असता आठ दिवस थांबा, असे त्यांना वारंवार सांगितले गेले. परंतु, वर्ष झाले तरीही याप्रकरणी सुधारणा झालेली नाही. अद्याप गुणपत्रक न मिळाल्याने या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विद्यार्थ्यांचे करिअर दावणीला लागले आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाच्या प्रशासनाने केवळ एकदाच मुंबई विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला आहे. यावरुन महाविद्यालयाच्या प्रशासनाची उदासीनता दिसून येते. कोणतीही ठोस पावले न उचलल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. डी. बी. जे. महाविद्यालयाने या प्रकरणी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. तरच या प्रश्नाला वाचा फुटेल. मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थीवर्गात नाराजी आहे.विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्याशी संपर्क साधल्याने कुलगुरुंनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला असेल. यात सुधारणा केली जाईल, असे कुलगुरु डॉ. देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महाविद्यालयाच्या बाजूने जेवढे प्रयत्न करायला हवेत तेवढे आम्ही केले आहेत. अर्थात विद्यापीठ ही यंत्रणा मोठी आहे. जेव्हा आम्ही तेथे पाठपुरावा करतो, संपर्क साधतो, त्यावेळी त्यांच्याकडून संकेत मिळाले. परंतु, गुणपत्रक आले नाही ही वस्तुस्थिती आहे. - डॉ. श्याम जोशी, प्राचार्य, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण