शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वायंगणीत भरणार कासव जत्रा

By admin | Updated: January 2, 2015 00:23 IST

सलग चौथे वर्ष : किरात ट्रस्टतर्फे आयोजन

प्रथमेश गुरव - वेंगुर्ले किरात ट्रस्टतर्फे व वायंगणी- वेंगुर्ले ग्रामस्थांच्या सहकार्याने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत सलग चौथ्या वर्षी कासव जत्रेचे आयोजन केले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही कासवजत्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनणार आहे.आॅलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मीळ प्रजाती देशात ओडिशा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते. त्यानिमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले, समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ या कासवांच्या विविध लिलांचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना यामुळे उपलब्ध होणार आहे. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावच्या कासव जत्रेची तारीख जाहीर झाली आहे. ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान वायंगणीच्या समुद्र किनाऱ्याच्या आॅलिव्ह रिडले कासवांच्या पिलांची फलटण समुद्राकडे परतताना पाहता येईल. सुहास तोरसकरांचा अनोखा उपक्रमदरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ही कासवं किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. या अंड्यांपासून बनविलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत, तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांचे भक्षण होऊ नये, म्हणून सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत, तिथे जाळं बसवतात आणि ५५ ते ६० दिवसांनी पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडलं जातं. जत्रेत कोकणी मेव्याची मेजवानी३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान यंदा पिल्लं बाहेर येतील, असा अंदाज कासव अभ्यासकांनी वर्तविला आहे. कासव दर्शनासह या कासव जत्रेत वायंगणी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, वायंगणी- कोंडुरा जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे फिल्म- शो, पाणी- पक्षी तज्ज्ञांशी गप्पा, दशावतार खेळ, अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी असे कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने आयोजित केले आहेत. या कासव जत्रेत सहभागी होण्यासाठी शशांक मराठे किंवा ‘्र१ं३३१४२३@ॅें्र’.ूङ्मे या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.