शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

साहील काळसेकर तडिपार होणार ?

By admin | Updated: January 10, 2015 00:15 IST

कारवाई अटळ : मकेश्वर यांच्याकडून प्रांताधिकाऱ्यांनी घेतली माहिती

चिपळूण : अट्टल गुन्हेगार साहील काळसेकर याच्याकडून गेल्या दोन दिवसात वेगवेगळे गुन्हे घडले असल्याने त्याच्या तडिपारीच्या प्रस्तावावर प्रांताधिकारी रवींद्र हजारे यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडून माहिती घेतली. काळसेकर याच्यावरील तडिपारीची कारवाई अटळ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याने विविध प्रकारचे गुन्हे केले आहेत. यातील काही गुन्ह्यांतून याची निर्दोष मुक्तता झाली असली तरी काही गुन्ह्यात शिक्षाही झाली आहे. त्याचे मूळगाव असलेल्या नायशी गावात तो कधीही येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांकडे अर्जही दिला आहे. तो आपल्या शिरळ येथील सासरवाडीत राहतो. तेथेही दहशत निर्माण केल्याने तेथील ग्रामस्थही भयभीत झाले आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना समोर आणले. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत त्याच्या तडिपारीचा प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांसमोर ठेवला होता. तेव्हापासून काळसेकर गायब होता. त्याच्या प्रस्तावाबाबतची कार्यवाही पुढील कार्यवाही झाली नव्हती. मात्र, चार दिवसांपूर्वी शिरळचे माजी उपसरपंच दिलावर काद्री यांच्यावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तो न्यायालयातही चुकीचा वागला. त्यामुळे त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकारी हजारे यांनी याबाबतची माहिती मकेश्वर यांच्याकडून घेतली असून, लवकरच त्याच्यावर तडिपारीची कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)पोलिसांसाठी कायमच आव्हान ठरलेला साहील काळसेकर मूळ गावी नायशी येथे येऊ नये म्हणून ग्रामस्थांनी स्थानिक पोलिसांकडे अर्ज दिला. शिरळ येथे तो राहात असला तरी साहीलबाबत तेथील ग्रामस्थही अद्याप भयभीत झालेले आहेत. त्यामुळे साहीलवरील कारवाईकडे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे भयानक गुन्हे.नायशी, शिरळ या दोन्ही गावांत साहीलच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत.प्रांताधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली काळसेकरबाबत माहिती.ग्रामस्थांचे कारवाईकडे लक्ष.