शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

पांढरपिसेने डोक्यात काठी तर पाटीलने हाताने मारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 4:47 PM

पण डोक्यावर मोठ्या वस्तूने प्रहार केल्यानेच डोक्याच्या आतील बाजूला जखम झाल्याचे पुढे आले आहे. तसेच गावकर याच्या अंगावर हाताने ठोसे मारल्याचेही पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता राजेश गावकर याच्या डोक्यात जी काठी मारली ती सुभेदार झिलबा पांढरपिसे याने मारली तर हाताने मारहाण अधीक्षक योगेश पाटील याने केल्याचे पुढे आले आहे.

ठळक मुद्देराजेश गावकर मृत्यू प्रकरण : आरोपीचा अहवाल कारागृह प्रशासनाला देणार; कारण गुलदस्त्यात

सावंतवाडी : येथील कारागृहातील वॉरंटवरील संशयित आरोपी राजेश गावकर याचा मृत्यू हा कारागृह अधीक्षक व त्याच्या सहकाºयांच्या मारहाणीतच झाला आहे. मात्र, ही मारहाण नेमकी कशी झाली याचा उलगडा झाला असून, यात कारागृह अधीक्षक योगेश पाटील याने हाताच्या ठोशांनी तर सुभेदार झिलबा पांढरपिसे याने डोक्यावर काठी मारल्याचे पुढे आले आहे. या दोघा आरोपींच्या शोधासाठी लवकरच पोलीस पथक पुणे येथे रवाना होणार असून, कारागृह महानिरीक्षकांनाही पोलीस आपला अहवाल लवकरच सादर करणार आहेत.

येथील कारागृहात देवगड येथील दारुच्या गुन्ह्यात अटक वॉरंट बजावलेला संशयित आरोपी राजेश गावकर हा १७ डिसेंबर रोजी सायंकाळी येथील कारागृहात दाखल झाला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. यामुळे कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. कारागृह प्रशासनाच्या कारभारावर सर्व बाजूंनी ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे कारागृह विभागाने आपल्यापरीने या प्रकरणाची चौकशी केली. तसेच पोलिसांनीही राजेश गावकर याच्या मृत्युप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली होती.

राजेश गावकर याच्या मृत्युनंतर शवविच्छेदन कोल्हापूर येथे करण्यात आले. त्यावेळी त्याच्या अंगावर १७ जखमा होत्या. यातील अनेक जखमा या कारागृहात दाखल झाल्यानंतरच्या होत्या. त्यामुळे प्राथमिक अहवाल येथील पोलिसांना मिळाल्यानंतर आणखी सखोल तपासणी करण्यात आली. यावेळी कोल्हापूर येथील वैद्यकीय पथक कारागृहात दाखल झाले. त्यांनी कारागृहाची तपासणी केली. यावेळी या पथकाने गावकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची पाहणी केली. गावकर पडल्यानंतर त्याच्या डोक्याला जखम होऊ शकते का हेही तपासले. पण त्यांना तसे काही आढळले नाही.

पण डोक्यावर मोठ्या वस्तूने प्रहार केल्यानेच डोक्याच्या आतील बाजूला जखम झाल्याचे पुढे आले आहे. तसेच गावकर याच्या अंगावर हाताने ठोसे मारल्याचेही पुढे आले आहे. याबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता राजेश गावकर याच्या डोक्यात जी काठी मारली ती सुभेदार झिलबा पांढरपिसे याने मारली तर हाताने मारहाण अधीक्षक योगेश पाटील याने केल्याचे पुढे आले आहे. दरम्यान, ही अचानक मारहाण करण्यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात असून, आरोपी मिळाल्यानंतरच या कारणाचा उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

दरम्यान, पोलिसांनी कारागृह अधीक्षक पाटील व सुभेदार पांढरपिसे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचा अहवाल कारागृह विभागाला पाठविण्याचे काम सुरू केले असून, आरोपींची प्राथमिक माहिती घेण्याचे कामही सुरू केले आहे. योगेश पाटील हा पुणे येथे ट्रेनिंग सेंटरमध्ये असल्याने लवकरच त्याच्या मागावर पोलीस पाठविण्यात येणार आहेत. तर पांढरपिसे हा वैद्यकीय सुट्टी टाकून कारागृहातून गेला आहे. त्याचीही माहिती पोलीस घेत आहेत.अधीक्षकांची जंत्रीच पोलिसांच्या हातीकारागृह अधीक्षकांचे कारनामे मोठे असून, एकामागे एक अशी जंत्रीच पोलिसांच्या हाती लागत आहेत. ही जंत्री बघून पोलीसही चांगलेच चक्रावून गेले आहेत. मात्र, पोलिसांनी यातील माहितीची सत्यता आरोपी मिळाल्याशिवाय करू शकणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पोलीस आरोपीच्या मागावर आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंगMurderखून