शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-मडगाव रेल्वे बंद पडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: July 7, 2015 23:05 IST

कोकण रेल्वे : भारमान नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून गंभीर दखल

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून रात्रीच्या वेळी धावणारी रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर रेल्वे भारमान नसल्याने डबघाईस आली आहे. ३१ मार्च २०१५ला सुरू करण्यात आलेली ही गाडी अवघ्या तीन महिन्यात बंद पडण्याच्या अवस्थेत आली असून, भारमान नसल्याने ही गाडी बंद करण्याचा विचार कोकण रेल्वे व्यवस्थापन गांभीर्याने करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.दादरहून रत्नागिरी येथे मध्यरात्री येणारी पॅसेंजर गाडी पुढे मडगाव - मंगलोेरपर्यंत विस्तारित करण्याचा कोकण रेल्वे प्रशासनाचा विचार होता. मात्र, ही बातमी रत्नागिरीवासीयांना समजताच या प्रस्तावाला तीव्र विरोध सुरू झाला. येथील प्रवाशांबरोबरच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फेही ही गाडी पुढे नेण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे काही काळ याबाबतची फाईल बंद झाली होती. मात्र, त्यानंतर दादरवरून रात्री येणारी दादर पॅसेंजर रत्नागिरीपर्यंत आल्यानंतर येथून ती पुढे मडगावला सोडण्यात येऊ लागली, तर मडगाव येथे असलेली दुसरी रेल्वे सायंकाळी ७ वाजता मडगाव स्थानकातून सोडली जात असून, ती रात्री १ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानकात येते. ही गाडी पहाटे ५.३० वाजता रत्नागिरी - दादर म्हणून सोडली जाते. दादर ते रत्नागिरीपर्यंत धावणारी ही पॅसेंजर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य लोक या गाडीने प्रवास करतात. रत्नागिरी स्थानकातच ही गाडी ‘फुल्ल’ असते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर या गाडीसाठी असंख्य प्रवासी प्रतीक्षेत असतात. ही पॅसेंजर गाडीही रत्नागिरीकरांसाठी पुरेशी नसल्याने रत्नागिरीहून दादरपर्यंत आणखी एक रेल्वेगाडी सुरू करावी, अशी जुनी मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. तसेच चिपळूण - मुंबई रेल्वेही सुरू करावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून जिल्हावासीयांतून सुरू आहे. या मागण्यांचा अद्यापही विचार झालेला नाही. मात्र, रत्नागिरीसाठी असलेली दादर पॅसेंजर गाडीही पळविण्याचा प्रयत्न झाला. तो यशस्वी झाला नाही म्हणून छुप्या पध्दतीने रात्रीच्या वेळी ही गाडी मडगावपर्यंत पुढे नेली जात आहे. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मडगावपर्यंत जाता यावे, असा उद्देश यामागे होता. या गाडीला उन्हाळी हंगामात कोकणवासीयांची गर्दी असतानाच मडगावकडे जाणारे प्रवासीही गर्दी करीत होते. आता पावसाळ्यात रत्नागिरी ते मडगाव व मडगाव ते रत्नागिरी या गाडीला भारमान नसल्याने तीन महिन्यात ही गाडी बंद करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)दादर पॅसेंजर जाणार होती मंगलोरपर्यंत...दादरहून रत्नागिरीपर्यत धावणारी पॅसेंजर गाडी चक्क मंगलोरपर्यंत नेण्याचा घाट प्रथम घातला गेला होता. मात्र, वेळेचे गणित न जमल्याने अखेर मडगावपर्यंत हीच गाडी पुढे नेण्यात येत आहे. दादर - मडगाव असे या गाडीला नाव न देता रत्नागिरी - मडगाव असे नाव देण्यात आले आहे. त्यामागे रत्नागिरीकरांचा रोष नको, हे समीकरण असल्याचीही चर्चा आहे.