शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
Top Marathi News Live: इराणने अमेरिकेला पाठवला नवा प्रस्ताव, पाकिस्तान मध्यस्थ
3
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
4
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
5
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
6
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
7
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
8
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
9
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
10
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
11
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
12
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
13
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
14
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
15
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
16
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
17
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
18
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
19
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
20
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात नाल्याचे पाणी घरांत

By admin | Updated: October 3, 2015 22:51 IST

मुसळधार पावसामुळे

चिपळूण : शहरातील पाग भागात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे भोसले चाळी जवळ असणारा नैसर्गिक नाला तुंबल्याने त्याचे पाणी भोसले चाळीतील घरांमध्ये शिरले. साडेचार लाखापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इतर भागातही पावसाचे पाणी साचून नुकसान झाले आहे. शनिवारी दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले. शहरासह तालुक्यात पडलेल्या पावसाने गोवळकोट येथे निलेश रामचंद्र किंजळकर यांच्या म्हशीवर वीज पडून नुकसान झाले. कळंबस्ते येथे एका घरावर वीज पडून नुकसान झाले. बकेदरकर आळीत माधव चितळे यांच्या घराजवळ वीज पडल्याने परिसरातील घरांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची नासधूस झाली. परशुराम येथे एका मोबाइल टॉवरवर वीज कोसळल्याचे वृत्त आहे. पाग भोसळे चाळीत नाल्याचे पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंसह, इलेक्ट्रिकल्स व इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची नासाडी झाली. घरातील घाणीचे पाणी व माती काढण्याचे काम आज दिवसभर सुरु होते. येथे १० कुटुंब आहेत. येथील नाल्यामध्ये झाडे झुडपे वाढल्याने शिवाय नाल्यात कचरा साचल्याने पाणी तुंबले . येथे असणारी संरक्षक भिंत कोसळून पाणी चाळीच्या दिशेने वळले. घरात पाणी साचल्याने रहिवाश्यांना रात्र जागून काढावी लागली. फ्रिज, वॉशिंग मशिन, टि. व्ही. सारख्या मौल्यवान वस्तूही पाण्यात भिजल्या. अभिजित सुरेश कवडे यांचं ३८ हजार ३०० रुपये, सुहासिनी कदम ४६ हजार ९६० रुपये, केतन पाटणे २२ हजार ९४० रुपये, गंगाराम खरात यांचे ४९ हजार ९०० रुपये, समिधा साळवी १ लाख २६ हजार ६०० रुपये, अरुणा सावंत यांचे ९५ हजार ७०० रुपये, लतिका लाहिम ६९ हजार १००रुपये नुकसान झाले. मोहन शिंदे यांची दुचाकी पाण्यात बुडाली. नुकसानीचा पंचनामा मंडल अधिकारी यु. एल. जाधव, तलाठी युवराज राजेशिर्के यांनी केला. ४ लाख ४९ हजार ५०० रुपयाचे प्राथमिक नुकसान आहे. चंद्रकांत आंबेकर यांचे घर बंद असल्याने नुकसानीचा आकडा समजला नाही. (वार्ताहर) पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची आज नगराध्यक्षा सावित्री होमकळस, बांधकाम सभापती बरकत वांगडे, गटनेते राजेश कदम, अभियंता सुहास कांबळे, आरोग्य निरिक्षक अशोक साठ,े नगरसेविका आदिती देशपांडे, रुक्सार अळवी, नगरसेवक शशिकांत मोदी, माजी नगरसेविका सीमा चाळके आदींनी पहाणी केली. चाळीमध्ये पाणी घुसुन नुकसान झाल्याचे समजताच हॉटेल व्यावसायिक एस. एम. तटकरे यांनी प्रत्येक कुटुंबाला सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण, २५ किलो तांदुळ व इतर किराणा सामान दिले. त्यांच्या दातृत्वाबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. आज शनिवारी सकाळ पर्यंत ७५.२२ मिमी पाऊस पडला तर चालू मोसमात एकूण २६५५.७७मि मी पावसाची नोंद झाली आहे.