Sindhudurg: कोळंबमध्ये गाव कमिटी अध्यक्षांवर गोळीबार, थोडक्यात बचावले; घराच्या भिंतीवर, दुचाकीवर आढळले छरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 13:10 IST2026-03-10T13:09:40+5:302026-03-10T13:10:02+5:30
हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले

Sindhudurg: कोळंबमध्ये गाव कमिटी अध्यक्षांवर गोळीबार, थोडक्यात बचावले; घराच्या भिंतीवर, दुचाकीवर आढळले छरे
मालवण : तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी गाव कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने, गोळी शेलटकर यांच्या डोक्याच्या बाजूने गेल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. ही घटना रविवारी रविवारी रात्री ९:१५ च्या प्रकारामुळे संपूर्ण कोळंब परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेलटकर हे घरी असताना अचानक अज्ञात व्यक्तीने त्यांच्या दिशेने गोळी झाडली. बंदूकीतील छरे किचन रूम, अंगण आणि तिथे उभ्या असलेल्या दुचाकीवरही आढळून आले आहेत. ज्या ठिकाणाहून गोळीबार झाला, तिथे पोलिसांना बुटांचे ठसे सापडले असून हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत.
"हा मला संपवण्याचाच प्रयत्न होता, सुदैवाने मी वाचलो," अशी प्रतिक्रिया संदीप शेलटकर यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
तपासाची चक्रे फिरली!
घटनेचे गांभीर्य ओळखून फॉरेन्सिक विभागाच्या टीमने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. परिसरात आढळलेले छरे आणि बुटांचे ठसे यावरून पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे.