शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पर्स चोरणाऱ्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: October 23, 2014 22:50 IST

सावंतवाडीतील घटना : पोलीस ठाण्यासमोरच व्हॅनमधून घेतली उडी

सावंतवाडी : झाडू विक्रीच्या उद्देशाने गोव्याहून सावंतवाडीकडे एस.टी. बसने येत असलेल्या दोन महिलांनी एस.टी.तच एका महिलेची पर्स चोरून त्यातील दहा ग्रॅमचे किमती दागिने लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या महिलेला गाडीतील प्रवाशांनी रंगेहात पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस त्या महिलेला व्हॅनमधून ठाण्यात नेत असतानाच त्यातील श्रावणी कोहली (वय ४२, रा. कोल्हापूर) या महिलेने पोलिसांच्या व्हॅनमधून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला येथील कुटिर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबतची माहिती अशी की, सायंकाळी पाच वाजता गोव्याहून सुटणाऱ्या पणजी-पुणे या एस.टी. बसमधून पश्चिम बंगाल येथील रिना बिश्वास या कुटुंबीयांसमवेत प्रवास करत होत्या. बिश्वास या पणजी येथे बसमध्ये चढल्या, तर आरती कोहली (वय ३२) व श्रावणी कोहली या महिला म्हापसा येथे बसमध्ये चढल्या. त्यांच्यासह दोन लहान मुलेही होती. ही बस सावंतवाडीत मोती तलावानजीक सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास येताच बिश्वास कुटुंबीय बसमधून उतरत असताना त्यांच्या मागील आरती व श्रावणी कोहली या महिलांनी रिना यांच्या पर्समध्ये हात घालून चेन हिसकावत आतील किमती दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. याची चाहूल रिना यांना लागली. तसेच अन्य प्रवाशांनीही ही घटना पाहिली. रिना यांनी आरडाओरडा केल्यावर प्रवाशांनी त्या दोघा महिलांना रंगेहात पकडले.अचानक घडलेल्या प्रकाराने एसटी चालक व वाहक यांनाही काही कळले नाही. ही बस तलावाकाठी सुमारे अर्धा तास उभी होती. यावेळी शहरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. एसटी वाहकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस दाखल होत त्यांनी त्या दोन महिलांना ताब्यात घेतले. त्या महिलांना पोलीस व्हॅनमधून ठाण्यात घेऊन जात असतानाच त्यातील श्रावणी या महिलेने पोलीस ठाण्याच्या समोर गाडी येताच व्हॅनमधून उडी मारली. त्यावेळी तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्राव होत होता. पोलिसांनी पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे तिला पोलिसांनी कुटिर रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, महिलेने व्हॅनमधून उडी घेतल्याने पोलिसांची तारांबळ उडाली आहे. पर्स चोरीप्रकरणी पोलिसांकडे लेखी तक्रार नोंदविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दाजी वारंग, संतोष नांदोस्कर करत आहेत. (प्रतिनिधी)