वंदे भारत एक्स्प्रेसला कुडाळजवळ अपघात; दोन जनावरांना धडक, कोकण रेल्वेचा ‘खोळंबा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:13 IST2026-02-10T19:12:34+5:302026-02-10T19:13:06+5:30

ओव्हरहेड वायर तुटल्याने साडेतीन तास वाहतूक ठप्प, आंगणेवाडीच्या भाविकांचे हाल

Vande Bharat Express meets with accident near Kudal Two animals hit, Konkan Railway 'delayed'! | वंदे भारत एक्स्प्रेसला कुडाळजवळ अपघात; दोन जनावरांना धडक, कोकण रेल्वेचा ‘खोळंबा’!

वंदे भारत एक्स्प्रेसला कुडाळजवळ अपघात; दोन जनावरांना धडक, कोकण रेल्वेचा ‘खोळंबा’!

कुडाळ : कोकण रेल्वेच्या वेगवान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान जनावरांनी धडक दिली. या अपघातात दोन जनावरांचा मृत्यू झाला असून, धडकेच्या तीव्रतेमुळे विजेचा खांब वाकून वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेमुळे कोकण रेल्वेची वाहतूक तब्बल साडेतीन तास जागीच खिळली, परिणामी प्रवाशांचे, विशेषतः आंगणेवाडीच्या भाविकांचे प्रचंड हाल झाले.

मडगावच्या दिशेने जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी ११:३० च्या सुमारास कुडाळजवळ आली असता रुळावर आलेल्या बैल आणि म्हशीला तिची जोरदार धडक बसली. एक जनावर ओव्हरहेड वायरच्या खांबावर आदळल्याने खांब वाकला आणि संपूर्ण मार्गाचा विद्युत पुरवठा खंडित झाला. अखेर डिझेल इंजिनच्या सहाय्याने रेल्वे बाजूला करून दुरुस्ती करण्यात आली आणि दुपारी ३:०५ वाजता वाहतूक पूर्ववत झाली.

स्थानकांवर गाड्यांच्या रांगा

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 'सुपरफास्ट' गाड्या विविध स्थानकांवर अडकून पडल्या होत्या.
कुडाळ : मांडवी, उदना, जनशताब्दी एक्स्प्रेस.
झाराप : राजधानी एक्स्प्रेस.
सावंतवाडी : दुरांतो एक्स्प्रेस.
कणकवली : मंगला एक्स्प्रेस.
मडुरा : मरूसागर एक्स्प्रेस.

आंगणेवाडीच्या भाविकांचे हाल

सध्या आंगणेवाडी जत्रेचा परतीचा प्रवास सुरू आहे. हजारो भाविक स्थानकांवर परतीच्या प्रवासासाठी थांबले असतानाच हा अपघात झाला. रणरणत्या उन्हात लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांना साडेतीन तास ताटकळत राहावे लागले. यामुळे स्थानकांवरील खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या स्टॉल्सवर मोठी गर्दी उसळली होती.

रेल्वेचे मोठे नुकसान

वंदे भारत : रेल्वेच्या दर्शनी भागाचे (Front Nose) मोठे नुकसान झाले आहे.
विद्युत खांब : जनावराच्या धडकेने लोखंडी खांब वाकल्याने रेल्वे तंत्रज्ञाना तो दुरुस्त करताना मोठी कसरत करावी लागली.
इंजिन बदल : विद्युत पुरवठा नसल्याने अखेर डिझेल इंजिन मागवून वंदे भारतला घटनास्थळावरून हलवावे लागले.

Web Title : कुडाल के पास वंदे भारत एक्सप्रेस दुर्घटनाग्रस्त; रेल यातायात बाधित

Web Summary : कुडाल के पास वंदे भारत एक्सप्रेस जानवरों से टकरा गई, जिससे दो की मौत हो गई और रेल यातायात 3.5 घंटे तक बाधित रहा। ओवरहेड तार का खंभा क्षतिग्रस्त हो गया, जिससे ट्रेनें रुक गईं और यात्रियों, विशेषकर आंगणेवाड़ी तीर्थयात्रियों को असुविधा हुई। डीजल इंजन से मरम्मत के बाद सेवाएं फिर से शुरू हुईं।

Web Title : Vande Bharat Express Hit Animals Near Kudal; Rail Traffic Disrupted

Web Summary : Vande Bharat Express struck animals near Kudal, killing two and disrupting rail traffic for 3.5 hours. An overhead wire pole was damaged, halting trains and inconveniencing passengers, especially Anganewadi pilgrims. Services resumed after repairs using a diesel engine.