वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 11:50 AM2021-07-21T11:50:57+5:302021-07-21T11:53:18+5:30

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2375.138 मि.मी. पाऊस झाला आहे.

Vaibhavwadi taluka has the highest rainfall of 157 mm. The rain | वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊस

googlenewsNext
ठळक मुद्देवैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पाऊसतिलारी प्रकल्पामध्ये 365.9210 द.ल.घ.मी पाणीसाठा

सिंधुदुर्ग  : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 157 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 57.25 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2375.138 मि.मी. पाऊस झाला आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी 

दोडामार्ग - 56.00(2241.00), सावंतवाडी - 50.00(2490.10), वेंगुर्ला - 35.00(2037.00), कुडाळ - 27.00(2236.00), मालवण - 11.00(2763.00), कणकवली - 82.00(2543.00), देवगड - 40.00(2211.00), वैभववाडी - 157.00(2480.00), असा पाऊस झाला आहे.

तिलारी प्रकल्पामध्ये 365.9210 द.ल.घ.मी पाणीसाठा

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 3 हजार 793 क्युसेक्स विसर्ग सुरू असून सध्या या प्रकल्पामध्ये 365.9210 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 81.79 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 65.40 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

उपयुक्त उपलब्ध पाणीसाठा 

  • मध्यम पाटबंधारे प्रकल्प - देवघर -62.2110, अरुणा - 60.7900, कोर्ले- सातंडी - 25.4740.
  • लघु पाटबंधारे प्रकल्प - शिवडाव - 2.6480, नाधवडे -3.3240, ओटाव - 2.5276, देंदोनवाडी - 1.1800, तरंदळे - 2.3610, आडेली -1.2880, आंबोली -1.7250, चोरगेवाडी - 3.2000, हातेरी - 1.9630, माडखोल - 1.6900, निळेली - 1.7470, ओरोस बुद्रुक - 2.2510, सनमटेंब - 2.3900, तळेवाडी - डिगस -1.8350, दाभाचीवाडी - 2.4210, पावशी - 3.0300, शिरवल - 3.6800, पुळास- 1.5080, वाफोली - 2.3300, कारिवडे- 1.3850, धामापूर - 2.4410, हरकूळ - 2.3800, ओसरगाव - 1.3390, ओझरम -1.8190, पोईप-0.8850, शिरगाव - 1.2340, तिथवली - 1.7230, लोरे - 2.6960 


जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पातळी

आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.900 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 5.000 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे. खारेपाटण पुलाजवळ वाघोटन नदीची पातळी 6.000 मीटर इतकी असून इशारापातळी 8.500 मीटर व धोका पातळी 10.500 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदुर्गनगरी यांनी दिली आहे.

Web Title: Vaibhavwadi taluka has the highest rainfall of 157 mm. The rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.