शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

vकुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने वनअधिकाऱ्यांना घेराओ घालणार

By admin | Updated: November 23, 2014 23:57 IST

निवेदनातून इशारा : हत्ती हल्ल्यातील जखमीला तातडीने मदत द्या

कुडाळ : वेताळबांबर्डे-गडकरवाडी येथील हत्तींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वैभव गायकवाड या युवकाला दोन दिवसात वनविभागाने आर्थिक मदत न दिल्यास कुडाळ तालुका राष्ट्रवादीच्यावतीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराओ घालण्यात येईल, असा इशारा कुडाळ तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर यांनी वनविभागाला दिला.वेताळबांबर्डे-गडकरीवाडी येथील वैभव गायकवाड या युवकावर रविवारी रानटी हत्तींनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते. वैभवला वनविभागाकडून आतापर्यंत फक्त पाच हजार रुपयांचीच मदत देण्यात आली असून या घटनेला चार ते पाच दिवस झाले तरी पूर्णपणे मदत दिली गेलेली नाही. यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, प्रदेश सरचिटणीस अमित सामंत, उपसभापती आर. के. सावंत, भास्कर परब, जिल्हा परिषद सदस्या रेवती राणे, पूनम सावंत, संग्राम सावंत, साबा पाटकर, कृष्णा बिबवणेकर, महादेव राऊळ, उत्तम सराफदार, अशोक पालव, संदीप राणे, शिवाजी घोगळे, धीरज पांचाळ, सूर्यकांत नाईक या राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कुडाळ वनविभागाचे वनक्षेत्रपाल संजय कदम यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली.यावेळी या हत्तींच्या कायमस्वरुपी बंदोबस्तासाठी कोणत्या उपाययोजना करणार, असा प्रश्न वनक्षेत्रपाल यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारला. यावर उत्तर देताना वनक्षेत्रपाल म्हणाले की, कर्नाटकातून हत्ती प्रशिक्षक मागविण्यात येणार असून हत्तींना पकडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल. हत्ती प्रशिक्षित करण्यासाठी आंब्रड येथे जागा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी यांना प्राथमिक स्वरुपात १४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती त्यांनी दिली.जखमी वैभवच्या औषधोपचाराचा सर्व खर्च वनविभागाने उचलावा, अशी मागणी यावेळी सर्वांनी केली. (प्रतिनिधी)