शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अघोषित भारनियमन सुरू

By admin | Updated: July 14, 2015 23:56 IST

मागणी वाढली : लांबलेल्या पावसाचा फटका

मालवण : राज्यात पाऊस लांबल्याने अघोषित भारनियमन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सोमवारपासून ही कार्यवाही सुरू झाली असून, वाढलेल्या उष्म्या बरोबरच इमर्जन्सी भारनियमनाचे चटके सहन करावे लागत आहेत. गेल्या १५ दिवसांत विजेच्या मागणीत सुमारे तीन ते ३.५ हजार मेगावॅटने वाढ झाली आहे. वाढलेली विजेची मागणी व पुरवठ्याची सांगड घालण्यात अडचणी येत असल्यामुळे संपूर्ण राज्यात अघोषित भारनियमन जारी करण्यात आले आहे, अशी माहिती वीज वितरणकडून देण्यात आली. सिंधुदुर्गात सकाळी ८ ते १० आणि दुपारी २ ते ४ या वेळेत इमर्जन्सी भारनियमन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे कृषिपंपाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी राज्यात असलेली १३,५०० ते १४,००० मेगावॅट विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यामुळे वीज मागणी व वीजपुरवठा यांचा मेळ घालण्यासाठी अघोषित भारनियमन लागू करण्यात आल्याने ग्राहकांतून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. (वार्ताहर)पावसाची प्रतीक्षामागील आठवड्यापासून पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. भरडावरील भातशेती करण्यासाठी सध्या शेतकऱ्यांना शेतीपंपाचा वापर मोठ्या प्रमाणावर करावा लागत आहे. सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे भातशेती करपून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.