Sindhudurg: साडेतीन लाखांचा अवैध खतसाठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 3, 2025 19:28 IST2025-06-03T19:27:53+5:302025-06-03T19:28:21+5:30

सिंधुदुर्ग  : देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ३.३१ लाख रुपये किमतीचा अनधिकृत खतसाठा ...

Unauthorized fertilizer stockpile worth Rs 3 lakh seized in joint operation by Agriculture Department and local police at Katvaneshwar in Devgad taluka | Sindhudurg: साडेतीन लाखांचा अवैध खतसाठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

Sindhudurg: साडेतीन लाखांचा अवैध खतसाठा जप्त, विक्रेत्यावर गुन्हा दाखल 

सिंधुदुर्ग : देवगड तालुक्यातील कातवणेश्वर येथे कृषी विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ३.३१ लाख रुपये किमतीचा अनधिकृत खतसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी कृषी सेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, यांना कातवणेश्वर येथील सुखकर्ता कृषिसेवा केंद्र या निविष्ठा केंद्राचे नजीकच्या शेतमांगरात कृषिसेवा केंद्राचे मालक राहुल राजेश जोईल, (रा. कुणकेश्वर कातवणेश्वर ता. देवगड) हे अवैधरीत्या रासायनिक व सेंद्रिय खताचा साठा व विक्री करत असल्याचे दिसून आले. संबधितांना विचारणा केली असता त्यांच्या जवळ खत विक्रीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळून आले.

खतांच्या अवैध विक्रीला आळा बसेल

कृषी विभागाच्या धडक कारवाईमुळे खतांच्या अवैध विक्रीला आळा बसण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक दुकानातूनच खते खरेदी करावीत आणि खरेदी करताना पक्के बिल घ्यावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अवैध विक्रीबाबत माहिती मिळाल्यास कृषी विभागाला कळवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

असा होता अवैध खतसाठा

शेतमांगराची तपासणी केली असता त्यामध्ये- महाराष्ट्र बायो फर्टिलायजर इंडिया प्रा. लि या कंपनीचे ब्राउन गोल्ड ऑरगॅनिक म्यँनुअर प्रत्येकी ५० किलो बॅग प्रत्येक बॅगची किंमत ९७५ रुपये असे एकूण १५६ बॅगची मिळून किंमत सुमारे १ लाख ५२ हजार १०० रुपये, यारा फर्टिलायजर इंडिया प्रा. लि. या कंपनीचे एनपीके १२:११:१८ या ग्रेडची प्रत्येकी २५ किलो बॅग, प्रत्येक बॅगची किंमत ३२०० रुपये असे एकूण ५६ बॅग मिळून किंमत सुमारे १ लाख ७९ हजार २०० असा एकूण ३ लाख ३१ हजार २०० रुपये किमतीचा अवैध खतसाठा आढळून आलेला आहे.

हा अवैध खतसाठा जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांनी स्थानिक पंच, पोलिस उपनिरीक्षक आणि कृषी अधिकारी, पंचायत समिती देवगड यांच्या समवेत पंचनामा करून शेतमांगर सील करण्यात आला आहे.

Web Title: Unauthorized fertilizer stockpile worth Rs 3 lakh seized in joint operation by Agriculture Department and local police at Katvaneshwar in Devgad taluka