शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

sindhudurg: गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन कुडाळमध्ये उद्धवसेनेची तहसीलदार कार्यालयावर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 13:39 IST

दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

कुडाळ : आखाती देशांतील युद्ध परिस्थितीमुळे देशभरात एलपीजी गॅस टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. कमर्शियल गॅस सिलिंडरची कमतरता भासू लागल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत, तर घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या गॅस वितरक केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. ऑनलाइन बुकिंग प्रक्रियेतही अनेक अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे शुक्रवारी उद्धवसेनेच्यावतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन छेडण्यात आले. शिवसैनिकांनी रिकामे गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन तसेच जोरदार घोषणाबाजी करत कुडाळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत गॅस टंचाईकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.गॅस सिलिंडर बुकिंगमधील ओटीपी प्रणालीत सुधारणा करावी, ऑनलाइन बुकिंगमध्ये अडचणी असल्यास ऑफलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच कमर्शियल गॅस सिलिंडर पुरवठा बंद असल्याने हॉटेल व्यावसायिकांसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत दोन दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला.यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक बबन बोभाटे, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर व गंगाराम सडवेलकर, बाळा कोरगावकर, मंदार शिरसाट, अतुल बंगे, राजू कविटकर, दीपश्री नेरूरकर, संतोष शिरसाट, संदीप म्हाडेश्वर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena protest in Kudal over gas cylinder shortage.

Web Summary : Uddhav Sena protested in Kudal against the gas cylinder shortage, led by Vaibhav Naik, demanding improved booking and supply. They threatened district-wide protests if demands aren't met.
टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरsindhudurgसिंधुदुर्गWarयुद्धShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेagitationआंदोलन