सिंधुदुर्गातील सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात दोन मृतदेह आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 14:27 IST2022-12-05T14:18:47+5:302022-12-05T14:27:04+5:30

कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने माजली खळबळ

Two dead bodies were found in Sonurli railway track area | सिंधुदुर्गातील सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात दोन मृतदेह आढळले

सिंधुदुर्गातील सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात दोन मृतदेह आढळले

सावंतवाडी : सोनुर्ली येथील सिद्धेश सगुण गावकर (२८) या युवकाचा शनिवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेची धडक बसून जागीच मृत्यू झाल्याची. ही घटना ताजी असतानाच ओडिसा येथील नाजू मलिक (२८) या युवकाचा सोनुर्ली येथील रेल्वे ट्रक परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. दोन दिवसात दोन मृतदेह आढळून आले आहेत.

रेल्वेची धडक बसल्यामुळे सोनुर्ली येथील सिद्धेश सगुण गावकर या युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना  शनिवारी रात्री घडली याबाबतची माहिती रेल्वेस्थानकाचे ट्रॅकमन विनोद चव्हाण यांनी दिली आहे. त्यानुसार पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. सिद्धेश हा आपले काम आटवून घरी जात होता. यावेळी त्याला रेल्वेची धडक बसली असावी असा अंदाज पोलीसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नाजू मलिक याचा मृतदेह रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आढळून आला आहे. मलिक हा युवक व्यक्ती ही वेडसर होती. त्याला नातेवाईक रेल्वे मधून ओडिसा येथे नेत होते. मात्र वाटेतच चालत्या रेल्वेतून त्याने उडी घेतली होती. त्यानंतर हा प्रकार कुडाळच्या आसपास घडल्याचा अंदाज व्यक्त करत नातेवाईकांनी त्याठिकाणी बेपत्ताची खबर दिली होती. तर त्याचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित मृत युवक हा वेडसर असल्याचे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. त्याला ओडिसा येथे नेत असताना त्याने चालत्या रेल्वेतून उडी टाकली होती. हा प्रकार कुडाळ परिसरात घडल्याचा अंदाज दाखवत नातेवाईकांनी त्या ठिकाणच्या पोलिसात याबाबतची खबर दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर  युवकाचा शोध घेतला.

मात्र तो आढळून न आल्याने बेपत्ताची नोंद कुडाळ पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तर आज त्याचा मृतदेह सोनुर्ली परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.सोनुर्ली परिसरात दोन दिवसात दोन मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Two dead bodies were found in Sonurli railway track area