आंबोली : आंबोली मुख्य धबधबा परिसरामध्ये पर्यटनासाठी आलेल्या सचिन गाडेकर यांची तीन तोळे सोने व इतर गोष्टी असलेली बॅग या परिसरामध्ये गहाळ झाली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून याबाबतचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.सचिन गाडेकर हे आपल्या दोन मुलांसह समुद्रकिनारी पर्यटनासाठी आले होते. त्या ठिकाणाहून परतल्यानंतर धबधबा परिसरामध्ये ते काही काळ थांबले. त्यादरम्यान त्यांची बॅग दुचाकीवर होती, नंतर ते या ठिकाणी थांबून पुढे निघाले. पुढे गेल्यानंतर आजरा येथे त्यांना आपली बॅग नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ते तत्काळ आंबोली धबधबा परिसरामध्ये आले. त्याठिकाणी शोधाशोध केली, परंतु ही बॅग आढळून आली नाही. आंबोली येथील पथक आंबोली पोलिस तसेच त्या ठिकाणच्या स्टॉलधारकांनी शोधाशोध केली. परंतु बॅग आढळून आली नाही. ती बॅग माकडाने नेली किंवा अन्य कोणी चोरली. याबाबत आंबोली पोलिस चौकशी करत आहेत. ती बॅग कुणाला आढळून आल्यास पोलिस स्थानक आंबोली येथे आणून द्यावी. आणून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.
आंबोली धबधब्याजवळून पर्यटकांची बॅग गायब, बॅगेत होते तीन तोळे सोन्याचे दागिने
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 16:41 IST