शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

तीन चोरट्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2015 01:22 IST

आंतरराज्य टोळी : कणकवली, कुडाळ, सावंतवाडीतील घरफोडी

सिंधुदुर्गनगरी : महिनाभर कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या शहरांमध्ये घडलेले घरफोडीतील गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस दलाने जिल्ह्यात ‘आॅपरेशन आॅल आऊट व आॅपरेशन कोंबिंग’ ही मोहीम राबवून जिल्ह्यात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तीन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात यश आले आहे. तर अद्यापही एका आरोपीचा शोध सुरु आहे. ही टोळी मूळची मध्य प्रदेश येथील असून, यातील उर्वरित आरोपींना लवकरच गजाआड करू, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुरेश सुभान मोहेल (वय २०), अशोक ध्यानसिंग अजनार (२५), रमेश जवान सिंह (२५) सर्व राहणार बघोली, ता. कुक्सी, जिल्हा धार- मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. दरम्यान, वरील तिन्ही संशयितांना २१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे म्हणाले की, जिल्ह्यात १ जूनपासून कुडाळ, कणकवली, सावंतवाडी या शहरांसह अन्य शहरांमध्ये एकूण २४ घरफोड्या दाखल झालेल्या आहेत. त्यापैकी वरील तिन्ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी चार घरफोड्या झालेल्या आहेत. या घरफोड्या एका ठरावीक विशिष्ट प्रकारे गुन्हे करणाऱ्या टोळीने केल्या असल्याची शक्यता होती हे आरोपींनी केलेल्या गुन्ह्याच्या कार्यप्रणालीवरून स्पष्ट होत होते. घरफोडीतील गुन्हेगार लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्यात १० जुलैला आॅपरेशन आॅल आऊट ही विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेत पोलीस अधीक्षकांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत रात्रभर गुन्हेगारांचा शोध घेत होते. १२ जुलैला कुडाळ पोलीस ठाण्यातील हवालदार कमलाकर साळसकर यांनी शहरातील बस स्टँड व वेताळबांबर्डे याठिकाणी एका संशयितास हटकून त्याच्याकडे चौकशी करीत असताना तो त्याच्याकडील बॅग टाकून पळून गेला. त्याच्याकडील मिळालेल्या बॅगेमध्ये साहित्य हे कुडाळ शहरातील झालेल्या घरफोडीतील असल्याचे निष्पन्न झाले. या आरोपीचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना वेताळबांबर्डे, ओरोस, सुकळवाड, तळगाव या परिसरामध्ये एकत्र करून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोंबींग आॅपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत जिल्ह्यातील १० अधिकारी १०० पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे आरोपी सुरेश मोहेल याला तळगाव क्रॉसिंग येथे सायंकाळी ६.३० वाजता अटक करण्यात आली. या आरोपीजवळ प्लेट, कमळ करंडा, वडघा, वेडणे, जोड करंडा, समर्ई, कंबर साखळी, पैजण, अगरबत्तीचे भांडे, निरंजन, नाणी, वाळा या सर्व वस्तू चांदीच्या होत्या तर ३१ हजार १९५ एवढी रोख रक्कम सापडली. आरोपी सुरेशकडून त्याचे इतर साथीदार कणकवली शहर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तत्काळ १५ अधिकारी व १७० कर्मचारी कणकवली येथे पोचले. त्या परिसरामध्ये कोंबींग आॅपरेशनद्वारे परिसर पिंजून काढून दुसरा आरोपी अशोक अजनार याला कणकवली एस. टी. स्टँड परिसरात रात्री १० वाजता ताब्यात घेण्यात आला. त्याच्याकडे चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य मिळून आले असून त्याची किंमत २४०० रुपये एवढी आहे. त्यानंतर पुन्हा कोंबींग आॅपरेशन राबवून तिसरा आरोपी रमेश सिंह याला १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता अटक करण्यात आली. हा आरोपीदेखील कणकवली एस. टी. स्टँड परिसरात सापडला. त्याच्याकडेदेखील मिळालेल्या बॅगेमध्ये चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य मिळून आले असून त्याची किंमत २४०० रुपये एवढी आहे. (प्रतिनिधी)