कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत सात दुकाने फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 14:48 IST2026-04-04T14:47:44+5:302026-04-04T14:48:27+5:30
Sindhudurg Crime News: कणकवली पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आचरा रोडवरील सात दुकाने चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहरात बसवलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.

कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्रीत सात दुकाने फोडली
कणकवली - कणकवली पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आचरा रोडवरील सात दुकाने चोरट्यांनी फोडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शहरात बसवलेले शासकीय सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला.
मात्र ,एका दुकानाच्या खाजगी कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे. शनिवारी पहाटे सना कॉम्प्लेक्समधील चार आणि राज मेडिकलसह अन्य तीन दुकानांची शटर उचकटून ही चोरी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक तेजस नलावडे, उपनिरीक्षक वृषाली बर्गे, हवालदार गुनिजन व पांडुरंग पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.चोरीला गेलेल्या ऐवजाचा नेमका आकडा अजूनही समजू शकलेला नाही.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आता चोरट्याचा शोध घेत आहेत. भरवस्तीत झालेल्या या धाडसी चोरीमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.