शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

Sindhudurg: चौघांवर हल्ला करुन बिबट्या दडी मारून बसला, वनविभागाने जेरबंद करताच ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:53 IST

वनविभागाला यश : मळेवाड ग्रामस्थांकडून सुटकेचा नि:श्वास; जखमींच्या प्रकृतीत सुधारणा

सावंतवाडी : मळेवाड-कोंडुरे देऊळवाडी येथे रविवारी चौघा ग्रामस्थांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्यानंतर बिबट्या देऊळवाडी येथील नदीलगतच्या शेडमध्ये दडी मारून बसला होता. हा बिबट्या बारा तासांपासून वनविभागाच्या नजरकैदेत होता.

सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला असून, तो कुठल्याही प्रकारे जखमी किंवा आजारी नाही. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती सावंतवाडीचे वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी दिली.रविवारी मळेवाड नजीकच्या कोंडुरे, देऊळवाडी येथे बिबट्याने वस्तीत शिरून चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये प्रभाकर मुळीक (६०), सूर्यकांत सावंत (६३), आनंद न्हावी (५४), पंढरी आजगावकर (५२) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर गोवा येथे उपचार सुरू आहेत. या प्रकारानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ला केलेला बिबट्या हा यातील जखमी प्रभाकर मुळीक यांच्या घरामागील बागेत लपल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता.या बागेच्या चारही बाजूंनी पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यातून बाहेर जाणे बिबट्याला कठीण असल्याने तसा संशय व्यक्त केला होता. परंतु, रविवारी उशिरापर्यंत तो निदर्शनास आला नव्हता. वनविभागाने सोमवारी सकाळी पुन्हा एकदा उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याची शोधमोहीम हाती घेतली. जखमी मुळीक यांच्या घरामागील बागेत वनविभागाची टीम दाखल झाली होती.यामध्ये वनक्षेत्रपाल सुहास पाटील, मळगाव वनपाल प्रमोद राणे, आजगाव, बांदा, मळगाव, माजगाव वनपरिमंडळातील वनकर्मचारी तसेच कुडाळ आणि सावंतवाडी येथील जलद कृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. शोधमोहिमेत हा बिबट्या मुळीक यांच्या बागेला लागून असलेल्या नदीच्या ठिकाणी मोटरपंपाच्या शेडमध्ये लपल्याचे निदर्शनास आले.अशी राबविली मोहीमवनविभागाने दोन पिंजऱ्यांच्या साह्याने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यामध्ये पंपाच्या शेडचा दरवाजा खालून कट करून त्या ठिकाणी लोखंडी पिंजरा बसविण्यात आला. शेडच्या पत्र्यावर चढून आतमध्ये पाणी ओतून त्याला हुसकावले. यानंतर बिबट्या पिंजऱ्यात कैद झाला. साधारण बारा तासांपासून ही पकडमोहीम सुरू होती.

ग्रामस्थांचा अंदाज खरा ठरलाप्रभाकर मुळीक यांच्या देऊळवाडी येथील घराबाहेर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बिबट्या पाण्यातून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे तो याच परिसरात असणार, असे ग्रामस्थांनी सांगितले होते. तशी मोहीम वनविभागाकडून राबविण्यात आली आणि त्यात वनविभागाला यश आले.