..त्यामुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा विरोधकांवर आरोप

By सुधीर राणे | Published: August 23, 2022 04:25 PM2022-08-23T16:25:21+5:302022-08-23T16:25:55+5:30

सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती.

That is why the opposition to the direct election of Sarpanch, Kankavali BJP district president Rajan Teli accused the opponents | ..त्यामुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा विरोधकांवर आरोप

..त्यामुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा विरोधकांवर आरोप

Next

कणकवली : नगराध्यक्ष आणि सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा लोकशाहीला बळकटी देणारा निर्णय घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने प्रस्थापितांच्या घराणेशाही प्रवृत्तीला चपराक लगावली आहे. सामान्य जनतेमधून नेतृत्व पुढे आल्यास ठरावीक घराण्यांची राजकारणातील मक्तेदारी संपुष्टात येईल. या भीतीमुळेच विरोधकांनी या निर्णयास विरोध सुरू केला आहे असा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला.

त्यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. महाराष्ट्र सरपंच परिषदेनेही या निर्णयाचे स्वागत केले आहे. जनतेचीही तीच मागणी असताना या निर्णयास विरोध करून विरोधकांनी आपली घराणेशाही मानसिकता स्पष्ट केली आहे.

सामान्य जनतेतून नेतृत्वाचा उदय होऊ नये व सत्तेची सगळी केंद्रे आपल्या मुठीतच रहावी. यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतत प्रयत्न केले. आता जनतेच्या भावनांचा आदर करणारे सरकार सत्तेवर आले आहे. सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेऊन भाजप-शिवसेना सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीविरोधी मोहिमेचा मुहूर्त महाराष्ट्रात केला आहे, असेही तेली यांनी म्हटले आहे.

Web Title: That is why the opposition to the direct election of Sarpanch, Kankavali BJP district president Rajan Teli accused the opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.