शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ नगरसेवक निवडणुकीस तूर्त स्थगिती

By admin | Updated: August 24, 2015 23:25 IST

उच्च न्यायालय : रत्नागिरीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना तात्पुरता दिलासा

रत्नागिरी : स्वतंत्र गट स्थापन करणाऱ्या चार नगरसेवकांना अपात्र करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयास आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून, या याचिकेवरील निर्णय होईपर्यंत रत्नागिरी पालिकेतील चार नगरसेवकांच्या जागा रिक्त झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या राजपत्रात घोषित करू नये, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे चार नगरसेवकपदाच्या संभाव्य निवडणूक प्रक्रियेला तूर्त स्थगिती मिळाली आहे. रत्नागिरी पालिकेच्या उपनगराध्यक्षपद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ६ पैकी ४ नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला व ११ नोव्हेंबर २०१४ रोजी झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार संजय साळवी यांना मतदान केले होते. त्यामध्ये स्मितल पावसकर, दत्तात्रय साळवी, प्रीती सुर्वे व मुनीज जमादार यांचा समावेश होता. नगरपरिषद निवडणूक कायद्यानुसार स्वतंत्र गट स्थापनेऐवजी अन्य पक्षात विलीनीकरण करणे आवश्यक होते. तसे न झाल्याने राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्षप्रतोद सुदेश मयेकर यांनी या चारही नगरसेवकांना अपात्र करण्याची मागणी २१ नोव्हेंबर २०१४ रोजी एका अर्जाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. गेल्या काही महिन्यांपासून अपात्रतेबाबतचा हा अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित होता. त्यावर २४ जुलै २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय दिला. त्यानुसार या चार नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात २९ जुलै २०१५ रोजी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. त्यावर २० आॅगस्ट २०१५ रोजी उच्च न्यायालयात आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. जोपर्यंत याचिकेवर निर्णय होत नाही, तोपर्यंत ही चार नगरसेवकपदे रिक्त झाल्याचे राजपत्रात घोषित करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला. याप्रकरणी सोमवारी (२४ आॅगस्ट २०१५) उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता १ सप्टेंबला होणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे रत्नागिरीत चार नगरसेवकपदांसाठी फेरनिवडणूक होणार असल्याच्या चर्चेला आता काही काळ तरी स्थगिती मिळाली आहे.