शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मालवण किनारपट्टीला लाटांचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 18:08 IST

जोरदार वाऱ्यासह खवळलेल्या समुद्री लाटांच्या तडाख्यामुळे देवबाग गावात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. ख्रिश्चनवाडीत एका घरावर झाड कोसळून आई व मुलगा जखमी झाले. देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली. तेथील शवदाहीनीही वाहून गेली आहे. किनारपट्टी भागात वीज खांब कोसळल्याने गावात दिवसभर वीजपुरवठा खंडित होता.

ठळक मुद्देमालवण किनारपट्टीला लाटांचा तडाखागावात दिवसभर वीजपुरवठा खंडित

मालवण : जोरदार वाऱ्यासह खवळलेल्या समुद्री लाटांच्या तडाख्यामुळे देवबाग गावात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. ख्रिश्चनवाडीत एका घरावर झाड कोसळून आई व मुलगा जखमी झाले. देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली. तेथील शवदाहीनीही वाहून गेली आहे. किनारपट्टी भागात वीज खांब कोसळल्याने गावात दिवसभर वीजपुरवठा खंडित होता.अरबी समुद्रात घोंगावणारे वायू चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकल्याने सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सकाळी वारा व लाटांचा प्रभाव काहीसा कमी झाला. मात्र, सायंकाळी लाटांचा जोर वाढून पाणी पुन्हा किनारपट्टी भागात घुसले.देवबाग ख्रिश्चनवाडी येथील किनारपट्टीलगत असलेल्या फेलीस फर्नांडिस यांच्या शौचालयाची टाकी कोसळून नुकसान झाले. तर लीना पर्रीकर यांच्या घरावर झाड कोसळले. त्यात घराचे लाकडी वासे कोसळून लीना व त्यांचा मुलगा जखमी झाला.शालू लुद्रीक यांच्या घरात समुद्राचे पाणी घुसले. वेलांकणी मंदिराचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. समुद्री लाटांनी देवबाग स्मशानभूमी गिळंकृत केली. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने बसविण्यात आलेला बायो टॉयलेट कोसळून त्याचे नुकसान झाले. रिचर्ड लुद्रीक यांच्याही शौचालयाचे नुकसान झाले आहे. स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष आबा हडकर व अन्य ग्रामस्थांनी नुकसानीची पाहणी केली.बोट व इंजिन तुटून नुकसानदेवबाग येथील आनंद परमेश्वर कुमठेकर यांची बोट किनाºयावर सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली होती. मात्र, पाण्याची पातळी अधिकच वाढल्याने जोरदार लाटांच्या तडाख्यात बोट व इंजिन तुटून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे.वीजखांब कोसळले; बत्ती गुलदेवबाग गावाला वीजपुरवठा करणारी मुख्य वीजवाहिनी किनाऱ्यावरून जाते. लाटांच्या तडाख्यात वीज खांब कोसळले. काही ठिकाणी वीज वाहिन्यांवर झाडे कोसळली. त्यामुळे वीजपुरवठा दिवसभर खंडित होता.शिवसेनेकडून पाहणीजिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, पंचायत समिती सदस्या मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, मनोज खोबरेकर, ग्रामपंचायत सदस्य फिलसू फर्नांडिस, निहीता गावकर, नागेश चोपडेकर, रमेश कद्रेकर, जॅक्सन फर्नांडिस, आंनद तारी यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. 

टॅग्स :environmentवातावरणsindhudurgसिंधुदुर्ग