शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

तृष्णा भागविणारी ‘सुरभी’ जनावरांसाठी पाणवठा : ओटवणेतील उपक्रम आदर्शवत

By admin | Updated: May 12, 2014 00:12 IST

महेश चव्हाण ल्ल ओटवणे उन्हाळा आला की नदीनाले, विहिरी कोरड्या पडू लागतात. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि माणसांसह मुक्या

महेश चव्हाण ल्ल ओटवणे उन्हाळा आला की नदीनाले, विहिरी कोरड्या पडू लागतात. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते आणि माणसांसह मुक्या जनावरांनाही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागते. ओटवणे गावही याला अपवाद नाही. परंतु ओटवणे रवळनाथ विद्यामंदिरचे संस्थापक शिक्षणमहर्षी कै. काका दामले यांनी विद्यामंदिरानजिक बांधणी केलेल्या ‘सुरभी’ या पाणपोईपासून प्रेरणा घेऊन तसे उपक्रम राबविल्यास ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील जनावरांचे होणारे हाल निश्चितच थांबणार आहेत. सूर्याच्या तप्त किरणांच्या उष्णतेने येथील सर्व प्राणीमात्रांसह मानवाची सुध्दा लाही लाही होत आहे. नदीनाले, खोल विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. मुक्या जनावरांना चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहावी लागत आहे. याला जबाबदार सर्वस्वी बेसुमार वृक्षतोड करणारा माणूसच आहे. त्याच्या या अविचारी कृत्यामुळे त्याच्याबरोबरच गुरे आणि अन्य मुक्या जनावरांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. यामुळे माणसाला पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा केला जातो, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात बुध्दीमान प्राणी असणार्‍या माणसालाही पाणी टंचाईची समस्या सोडविताना अनेक खटाटोप करावे लागतात. मग मुक्या प्राण्यांचा कसा निभाव लागेल? माणूस माणुसकीच्या नात्याने एकमेकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करतो. परंतु मुक्या जनावरांच्या भावना जाणून घेऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करणारी माणसे दुर्मीळच. श्री रवळनाथ मंदिरचे संस्थापक कै. काका दामले हे यातीलच एक व्यक्तिमत्व. उन्हाळ्याच्या दिवसात नदीनाले, विहिरी सुकून गेल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करावी लागते. तृष्णा शांत करण्यासाठी जनावरांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी त्यांनी रस्त्याच्या बाजूला सुरभी या पाणपोईची बांधणी केली आहे. माणसासाठी कुलर अथवा तत्सम पाण्याची सोय केली जाते. परंतु जनावरांच्या पाण्याच्या सोयीची समस्या कोणापर्यंत पोहोचली नव्हती. या भावनेच्या पलिकडचा ठाव कै. काका दामले यांनी घेत गुरांसाठी, पक्ष्यांसाठी पाणपोई बांधली आहे. चरायला गेलेली गुरे उन्हातून घरी परतताना या पाणपोईवर निवांतपणे पाणी पिऊन पुढे मार्गस्थ होतात. आकाशात चहुबाजूंनी घिरट्या घालणारे पक्षीही ‘सुरभी’च्या पाण्याने जीव शांत करतात.