लोणंद (जि. सातारा) : गर्भवती पत्नीसह व अडीच वर्षीच्या मुलाचा गळा दाबून खून करुन भाजी विक्रेत्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना लोणंद येथील इंदिरानगरमध्ये रविवारी सायंकाळच्या दरम्यान घडली. संदीप चंद्रकांत कोळेकर (वय ३५), पत्नी रेखा (वय ३०) व मुलगा आदेश (अडीच वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. संदीप यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. २०१० मध्ये त्यांचा रेखा हिच्याशी विवाह झाला. संदीप यांचे घर रविवारी दुपारी तीनपासून रात्री आठ वाजेपर्यंत बंद होते तरी घरातून टीव्हीचा आवाज येत होता. शेजारी राहणाऱ्या महिलेने दरवाजाच्या फटीतून आत पाहिले असता फरशीवर रेखा पडलेल्या दिसल्या. त्यांनी ही माहिती तातडीने शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी दरवाजा मोडून घरात प्रवेश केला. या वेळी त्यांना रेखापाठोपाठ बैठक हॉलमध्ये आदेश मृतावस्थेत आढळला तर आतील खोलीत संदीप छताच्या लोखंडी अँगलला गळफास घेतल्याचे दिसले. लोणंद पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. (वार्ताहर)
गर्भवती पत्नीसह बालकाचा खून करून आत्महत्या
By admin | Updated: February 21, 2017 03:57 IST
गर्भवती पत्नीसह व अडीच वर्षीच्या मुलाचा गळा दाबून खून करुन भाजी विक्रेत्या युवकाने गळफास घेऊन
गर्भवती पत्नीसह बालकाचा खून करून आत्महत्या
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}