शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

सुदेश आचरेकर यांना दोन वर्षे कारावास

By admin | Updated: July 1, 2015 00:20 IST

सरकारी कामात अडथळा प्रकरण : आचरेकर मालवणचे माजी नगराध्यक्ष

मालवण : मालवण नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीवेळी मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर धावून जात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मालवण न्यायालयाने माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोन वर्षे सश्रम कारावास व ५० हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या सर्व शिक्षा त्यांनी एकत्रित भोगावयाच्या असल्याचेही न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मालवण नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी २९ जून २०१४ रोजी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. यादिवशी पोटनिवडणुकीकरिता उभ्या असलेल्या उमेदवार स्नेहा सुदेश आचरेकर वयस्कर महिलेस मतदानकेंद्रात घेऊन जात होत्या. बंदोबस्तावरील परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक कलगोंडा रघुनाथ पाटील (वय २९) यांनी त्यांना उमेदवार मतदारांना मतदानकेंद्रात नेऊ शकत नाही, अशी सूचना केली. त्याचवेळी स्नेहा आचरेकर यांचे पती व तत्कालीन नगराध्यक्ष सुदेश आचरेकर हे उपनिरीक्षक पाटील यांच्या अंगावर धावून आले व बंदोबस्ताच्या कर्तव्यात दहशतीने अडथळा करून धमकी दिली व पाटील यांचे न ऐकता वयस्कर महिलेस मतदान केंद्रात घेऊन गेले. उपनिरीक्षक पाटील यांनी त्याबाबत मालवण पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर तत्कालीन नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणाचा मंगळवारी दिवाणी न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी निकाल जाहीर केला. गुन्ह्यात सुदेश आचरेकर हे दोषी आढळून आले. सरकारी पक्षाच्यावतीने अ‍ॅड. सतीशकुमार धामापूरकर यांनी कामकाज पाहिले. दरम्यान, आचरेकर यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने तो मंजूर केला आहे. (प्रतिनिधी)वेगवेगळ््या गुन्ह्यांमध्ये शिक्षान्यायालयाने दिलेल्या निकालात आचरेकर यांना १ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड भरावयाचा आहे. तसेच तीन महिने साधा कारावास व ५०० रुपये दंड भरावयाचा आहे. दंड न भरल्यास १० दिवस साधा कारावास भोगावयाचा आहे. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात १ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंड भरावयाचा आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भोगावयाचा आहे. या सर्व शिक्षा आचरेकर यांनी एकत्रित भोगावयाच्या आहेत, असेही निकालपत्रात नमूद करण्यात आले आहे.