शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

माहेरच्या संस्कारांमुळेच यशस्वी

By admin | Updated: January 10, 2015 00:27 IST

सुमित्रा महाजन : चिपळूण येथे नागरी सत्कार; बालपणीच्या आठवणींना उजाळा

चिपळूण : चांगले संस्कार समाजात टिकून असतात. माझ्यावर बालपणी झालेल्या संस्कारामुळेच मी आज चांगले काम करत आहे. ही तुमच्याच संस्काराला तुम्ही दिलेली दाद आहे. चांगल्या संस्काराचे प्रतिबिंब समाजात उमटत असते, असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा आणि चिपळूणची माहेरवाशीण सुमित्रा महाजन यांनी केले.चिपळूण येथील अण्णासाहेब क्रीडा संकुलात लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर व चिपळूण नगर परिषद यांच्यातर्फे लोकसभा अध्यक्ष महाजन यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्कारापूर्वी श्रीदेव विरेश्वर मंदिर परिसरात गजानन फडके नगरीत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्षा महाजन यांच्या हस्ते झाले. आपल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. आई-बापाविना असणारी पोर मधुकाका बर्वे यांनी पदरात घेतली. इथपासून ते आपले वडील आप्पा साठे यांच्या दराऱ्याबाबत व चिपळूणमधील सर्व समाजाशी त्यांची जुळलेली नाळ त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केली. चिपळूणची माणसं प्रथमपासूनच कोणतेही काम एकत्र येऊन करायचे. येथे अनेक घटना घडल्या. परंतु, त्याचा परिणाम समाज जीवनावर कधीही झाला नाही. अडचणीच्या काळात सर्व चिपळूणकर एकत्र येऊन मदत करीत, हे चिपळूणचं चरित्र आजही कायम आहे. हे कायम राहणे जरुरीचे आहे. कारण त्यातून माणूस घडत असतो. माहेरची ओढ प्रत्येकाला असते. माहेरात ताकद आहे. मी येथून जाताना प्रामाणिकपणा नेला. चिपळूणमध्ये आमचं घरी नाही, पण प्रत्येक घरात आपल्याबाबत प्रेम आहे. हा संस्कार आहे. पैसे कमविण्याची गरज नाही. जेवढे आहे तेवढे मिळेल, हे सांगताना त्या गहिवरल्या होत्या. चिपळूणचे संस्कार घेऊन सासरी गेले. तेथे टिकून राहिले म्हणूनच मला चांगले काम करता आले. बॅ. अंतुले मुख्यमंत्री झाले, तेव्हा कोकणवासियांना आनंद झाला. त्यांनीही कोकणच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. कोकणातील माणसांत एकमेकांबद्दल प्रेम असते. याबाबत त्यांनी काही दाखले दिले.आपण कोकण विकासाच्या गप्पा मारतो, पण कोकणातील पर्यटन जपले पाहिजे. येथील समुद्रकिनारे प्लास्टिकच्या पिशव्यांनी भरले आहेत. माझ्याकडून कोकणासाठी जे जे करता येईल ते मी करेन, असे त्या आवर्जून म्हणाल्या.शतायू ग्रंथालयाची योजना चांगली आहे. ग्रंथ, ग्रंथकार यांच्याशी माणूस जोडलेला आहे. त्यातूनच माणूस जगेल ही कल्पना चांगली आहे. आपण ही कल्पना आपल्या सासरी सांगू. जे चिपळूणमध्ये झाले ते इंदोरमध्ये व्यापारी राजधानीत का होणार नाही, असा प्रश्नही त्यांनी केला. संस्कारक्षम पिढी बनविण्यासाठी ग्रंथालयांचे काम महत्त्वाचे आहे. ग्रंथालय शतायू होणे ही फार कठीण गोष्ट आहे. चिकाटीने वाचनालय चालविणे अवघड आहे, असेही त्यांनी कौतुकाने नमूद केले.आपल्या शालेय जीवनाबद्दल व जुन्या शिक्षकांच्या आठवणी सांगताना त्यांनी जुन्या कविता सांगितल्या. जुने शिक्षक घराघरांत पोहोचलेले असत. त्यांना घराची माहिती असे. शिक्षक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असत. आता परिस्थिती बदलली आहे. कदाचित वर्गात जास्त मुलेही असतील. पण, मुलांचा चेहरा शिक्षकांना वाचता आला पाहिजे. ७० वर्ष होऊनही तो संस्कार आजही आठवतो, असे त्या म्हणाल्या.चिपळूण नगर परिषदेतर्फे नगराध्यक्षा सावित्री होमकळस, तर वाचनालयातर्फे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी अध्यक्षा महाजन यांचा सत्कार केला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेश कदम, ८८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माधव गवळी, लोटिस्माचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, प्रज्ञा धनावडे, संजय भुस्कुटे, मुख्याधिकारी गणेश जावडेकर उपस्थित होते. लोटिस्माचे अध्यक्ष अरविंद जाधव यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कांता कानिटकर यांनी मानपत्राचे वाचन केले. (प्रतिनिधी)