शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: सरस्वतीपूजन आटोपून घरी परतताना विद्यार्थी अपघातात ठार; भरधाव कारची धडक, अन्य दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:30 IST

मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथील घटना; संतप्त ग्रामस्थांनी महामार्ग रोखला

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर झाराप फाटा येथे मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने एका दुचाकी मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दहावीत शिकणारा लवू पेडणेकर (वय १६) हा जागीच ठार झाला. तर मोपेडवरील अन्य दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि.३०) दुपारी झाला. अपघातानंतर महामार्गावरच मृतदेह ठेवत संतप्त नागरिकांनी दीड-दोन तास वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.लवू पेडणेकर (वय १६), रोशन पेडणेकर (वय १८) व सोहम परब (वय १३) हे साळगाव नाईकवाडीतील राहणारे असून, साळगाव हायस्कूलमध्ये दहावीत शिकत आहेत. मंगळवारी दुपारी साळगाव हायस्कूल येथे सरस्वतीपूजन करून हे तिघेही विद्यार्थी मोपेड स्कूटरवरून जात होते.

मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथे रस्ता ओलांडत असताना मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या मोपेडला धडक दिली. धडक इतकी जोरात होती की तिघेही फेकले गेले. यात लवू पेडणेकर हा जागीच ठार झाला. तर रोशन पेडणेकर व सोहम परब हे गंभीर जखमी झाले. जखमींना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.‎अपघाताची घटना समजताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अनेक अपघातांमुळे त्रस्त झालेल्या झाराप परिसरातील नागरिकांनी लवूचा मृतदेह रस्त्यावर ठेवत रास्ता रोको केला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे तसेच बांधकाम विभागाचे अधिकारीही दाखल झाले.‎

अपघातप्रकरणी कुडाळ पोलिसांनी कारचालक राज आचरेकर (वय १८, रा. देवगड) याला ताब्यात घेतले आहे. राज व सोबत अन्य त्याचे मित्र सावंतवाडीहून कुडाळच्या दिशेने जात होते. रास्ता रोको सुरू असताना माजी आमदार वैभव नाईक घटनास्थळी दाखल होत त्यांनी माहिती घेतली. नागरिकांनी उपस्थित असलेले बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.गंभीर जखमी रोशन पडणेकरला गोव्याला हलविले‎ या अपघातातील गंभीर जखमी रोशन पडणेकरला अधिक उपचारासाठी गोव्याला हलविले आहे. तर सोहम परब याच्यावर सावंतवाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Sindhudurg: Student Dies in Accident After Saraswati Puja; Two Injured

Web Summary : A 16-year-old student died, and two others were severely injured in Sindhudurg when a speeding car hit their moped after Saraswati Puja. The accident led to a road blockade by angry locals. The car driver has been arrested.