शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आचरा बंदरात संघर्ष; २५ जखमी

By admin | Updated: November 1, 2015 00:08 IST

पोलिसांवरही हल्ला : पर्ससीन-पारंपरिक मच्छिमार भिडले

आचरा/मालवण : पर्ससीन व पारंपरिक मच्छिमारांमध्ये आचरा बंदर येथे शनिवारी सायंकाळी जोरदार संघर्ष झाला. यावेळी दोन पर्ससीन जाळ्यांसह एक बोट पेटवून देण्यात आली. दोन्ही गटांतील मच्छिमार व महिलांसह २० ते २५ जण जखमी झाले, तर एक महिला पोलीस कर्मचाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, आचरा पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांवर लाठीमार करून परिस्थिती काहीशी नियंत्रणात आणली. जखमींवर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत. यातील विजय ढोके, साईन मुजावर, फिरोज मुजावर व महिला पोलीस कर्मचारी दर्शना पालकर या गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालय व गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. आचरा येथील तणाव स्थितीनंतर पोलिसांनी जादा सशस्त्र पोलीस बंदोबस्त मागविला आहे. शुक्रवारी आचरा बंदरात पारंपरिक मच्छिमारांनी अनधिकृत मिनीपर्ससीन विरोधात उपोषण आंदोलन छेडले होते. यावेळी मत्स्य विभागाने १६ अनधिकृत मिनीपर्ससीन बोटींवर कारवाई केली. उपोषण मागे घेतल्यानंतर रात्री पारंपरिक मच्छिमार व स्थानिक पर्ससीननेटधारकांत वादाची ठिणगी पडली. त्यानंतर मालवणात पारंपरिक मच्छिमारांनी बैठक घेऊन आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली होती. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आचरा येथील स्थानिक मिनीपर्ससीनधारक व पारंपरिक मच्छिमार यांच्यात वाद झाला. हा वाद काही क्षणातच (पान १० वर)शिगेला पोहचला. मालवणातील शेकडो पारंपरिक मच्छिमार आचरा बंदरात दाखल झाले. त्यानंतर स्थानिक पर्ससीन मच्छिमार व पारंपरिक मच्छिमारांत जोरदार राडा झाला. काहीजणांनी किनाऱ्यावरील पर्ससीनची जाळी व बोटींना आग लावली. आमदारांवर मच्छिमारांची नाराजी आमदार वैभव नाईक घटनास्थळी दाखल झाले असता मच्छिमारांनी शुक्रवारी संघर्ष आंदोलन सुरु असताना आपण होता कुठे? असा सवाल करत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आमदार नाईक यांनी या वादास मत्स्य विभाग व मत्स्योद्योग मंत्री जबाबदार आहे, असा आरोप केला. त्यांच्याकडे वारंवार बैठकीची मागणी करूनही बैठक लावली नाही. त्यामुळेच हा जीवघेणा संघर्ष घडला असे सांगत मच्छिमारांना न्याय मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले. पोलीस छावणीचे स्वरूप व धरपकड मोहीम :आचऱ्यातील या संघर्षानंतर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, उपविभागीय अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचारी, दंगा काबू पथक आचऱ्यात दाखल झाले. आचरा परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांनीही धरपकड मोहीम सुरु केली आहे. काही आंदोलनकर्त्यांवर रात्री उशिरा पोलिसांची कारवाई सुरु होती. संघर्षानंतर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, व्यापारी व ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. या घटनेमुळे आचऱ्यातील शांततेला गालबोट लागले असल्याचा सूर होता.(प्रतिनिधी) 

जोरदार दगडफेकया संघर्षात दोन्ही गटांकडून जोरदार दगडफेक करण्यात आली. काही जणांनी घरात घुसून मारहाण केली. शिगा, दांडे, फावडे आदींचा वापर करताना डोळ्यात मसाला फेकही करण्यात आली. वाद मिटवण्यास पुढे आलेल्या पोलीस व पत्रकारांना धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली. यात महिला पोलीस दर्शना पालकर गंभीर जखमी झाल्या, तर अक्षय भेंडे, सचिन जाधव, कैलास ढोले हे पोलीस कर्मचारी जखमी झाले.  

दोन्ही गटाचे मच्छिमार जखमी या संघर्षात दोन्ही बाजूचे २० ते २५ मच्छिमार जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला व मुलांचाही समावेश आहे. या जखमींमध्ये विजय ढोके, सतीश भगत, शाइन मुजावर, फिरोज मुजावर या चार गंभीर जखमींना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. तर मनवेल गोन्साल्वीस, द्वारकानाथ पेडणेकर, इमरान मुजावर, आबू वाक्कर मुजावर, भाऊ मोरजे, विना साळकर, रामडू पेहराव, सकलीन मुजावर, अब्कुर मुजावर, वसंत मिसाळ, पिकेश्वर चंदन, समीर मुजावर, इमरान काझी, राजू मुल्ला, नजमुद्दीन मुल्ला, जान्गीयार मुंडल, नुर्हस्न मुंडल यासह अन्य मच्छिमारांवर आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.