दाऊदच्या घरावर कडक पोलीस बंदोबस्त

By Admin | Updated: February 20, 2016 00:52 IST2016-02-20T00:52:08+5:302016-02-20T00:52:36+5:30

मुंबके येथील घर : अनोळखी व्यक्तींचा वावर वाढला

Strong police settlement of Dawood's house | दाऊदच्या घरावर कडक पोलीस बंदोबस्त

दाऊदच्या घरावर कडक पोलीस बंदोबस्त

खेड : कुख्यात गुन्हेगार दाऊन इब्राहिम कासकर याच्या खेड तालुक्यातील मुंबके येथील मूळ घरावर पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्तास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या या घरात अनोळखी लोकांचा वावर असल्याच्या संशयावरून ही गस्त सुरू केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.मुंबके येथील त्याचे हे राहते घर त्याच्या बहिणीच्या नावावर आहे. हे घर सध्या सरकारच्या ताब्यात आहे़ मात्र गेल्या काही दिवसांतील त्याच्या घरात अनोळखी इसमांचा वावर असल्याच्या संशयावरून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी चिन्मय पंडित यांना या घरावर पाळत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसे आदेश खेड पोलीस स्थानकाला देण्यात आले आहेत.
खेड पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि बीट अंमलदार तसेच कर्मचारी असे पोलिसांचे पथक या घरावर पाळत ठेवत आहेत. दररोज ही गस्त सुरू असून, प्रत्येक आठवड्याचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Strong police settlement of Dawood's house