शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

तेलींना उमेदवारी दिल्यास प्रखर विरोध

By admin | Updated: September 17, 2014 22:27 IST

सतीश सावंत : सावंतवाडीत काँग्रेसची विधानसभा मतदारसंघ बैठक

सावंतवाडी : कार्यकर्त्यांना कधी साधा चहा न देणारे माजी आमदार राजन तेली गावागावात जाऊन गाव पुढाऱ्यांना पैसे कुठून देतात? हे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित करत यापुढे गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय गप्प बसू नका. तसेच या मतदारसंघात तेली यांना उमेदवारी दिली असल्यास प्रखर विरोध राहील, असे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांना देण्यात येईल, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी सावंतवाडी येथील काँग्रेसच्या विशेष बैठकीत सांगितले. तसेच यावेळी माजी आमदार राजन तेली यांच्या विरोधात काम करण्याचा ठरावही संगनमताने घेण्यात आला. येथील मातृछाया मंगल कार्यालयात काँग्रेस विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले हाते. यावेळी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, वसंत केसरकर, प्रांतिक सदस्य विकास सावंत, संदीप कुडतरकर, काँग्र्रेस प्रवक्ते राजेंद्र परूळेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्ग अध्यक्ष राजू निंबाळकर, अंकुश जाधव, प्रमोद कामत, एम. के. गावडे, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, सभापती प्रमोद सावंत उपस्थित होते. नीतेश राणे यांच्या स्टेटमेंटचे कारण साधून स्वत:च्या स्वार्थापोटी तेली हे वेळोवेळी लांब राहिले, असेही यावेळी सावंत यांनी सांगितले. माजी आमदार दीपक केसरकर हे आधीपासूनच आमचे शत्रू आहेत. आता या पंगतीत राजन तेली हे देखील बसले आहेत. त्यामुळे हे दोन्ही आपले शत्रू आहेत. राजन तेली यांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सिंधुदुर्ग जिल्हा बँक पवारांना देण्याच्या आश्वासनाने झाला असल्याचेही सावंत यांनी सांगितले. जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विचारात न घेता परस्पर निर्णय घेतले जात आहेत. यामुळे हे नवीन काँग्रेसवाले जुन्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करीत आहेत, असे दिलीप नार्वेकर यांनी सांगितले. जे नारायण राणेंच्या विरोधात गेले, त्यांच्याशी हात देण्याची गरज नाही. काँग्रेसमध्ये राहून पोखरायची कामे करू नका. काँग्रेसमधून जर कोणी काँग्रेस पोखरायची कामे करीत असल्यास त्यांची तंगडी तोडू, असे मनिष दळवी यांनी सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी यांना लढत द्यायची असेल, तर काँग्रेसने एकसंघ राहिले पाहिजे, असे बाळा गावडे म्हणाले. सावंतवाडी मतदारसंघातील वेंगुर्ले तालुका अध्यक्ष मनीष दळवी, दोडामार्ग तालुका अध्यक्ष राजू निंबाळकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष बाळा गावडे या तीन तालुकाध्यक्षांच्या कार्यकारिणीने राजन तेली यांचा प्रचार न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यातआला. (वार्ताहर)