शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधु महोत्सवाची उधळपट्टी थांबवा

By admin | Updated: December 23, 2014 23:42 IST

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ‘तो’ निधी शेतकऱ्यांना द्या

सिंधुदुर्गनगरी : प्रशासनामार्फत मालवण येथे जानेवारी महिन्यात सिंधु महोत्सव आयोजित करण्यात आला असून यासाठी १ कोटी रूपये खर्च होणार आहे. ही कोटीची होणारी उधळपट्टी थांबवावी व हा निधी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्याकडे भेटीदरम्यान केली.निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनामार्फत मालवण येथे सिंधु महोत्सव होत असून त्यासाठी एक कोटी रूपये खर्च येण्याची शक्यता आहे. या निधीची उधळपट्टी करण्यापेक्षा तो शेतकऱ्यांच्या मदतीला द्या, अशी मागणी यावेळी केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बागायती व शेतीचे हत्तीने नुकसान केली. या नुकसानीतून मिळणारी अल्प मदतही शेतकऱ्यांना मिळालेली नसून त्याचा सुमारे ३५ लाखाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील शेतकरी या नुकसानीमुळे हवालदिल झालेले आहेत. तसेच विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस व वेगवेगळ््या हवामानाच्या कारणाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुमारे ५ हजारपेक्षा जास्त गावे शासनास दुष्काळग्रस्त घोषित करीत असताना सुमारे ७०० हून अधिक आत्महत्याही विदर्भ, मराठवाड्यात झाल्याच्या नोंदी आहेत. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील नागरिकांनी महोत्सव साजरे करून परजिल्ह्यातून येणारे मंडप, लाईट, साऊंड यांचे ठेकेदार तसेच वेगवेगळ््या क्षेत्रातील कलाकारांच्या नाचगाण्यांवर पैशाची उधळपट्टी करणे उचित वाटत नाही. कोट्यवधी निधीचा वापर शेतकऱ्यांना मदत स्वरूपात करावा, अशी मागणी केली आहे. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष नारायण कुबल, तात्या पवार, समीर आचरेकर, शैलेश वेरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)