शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

एसटीला आता मालवाहतुकीचा आधार, सिंधुदुर्ग विभागाला साडे अकरा लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:18 PM

state transport Sindhudurg : कोरोना परिस्थिती पूर्वपदावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. ही आर्थिक हानी भरून काढण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय एसटी महामंडळाने निवडला आहे.सध्यातरी त्याचाच आधार एसटीला असून सिंधुदुर्ग विभागाला मे महिन्यात माल वाहतुकीतून ११ लाख ५४ हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

ठळक मुद्देएसटीला आता मालवाहतुकीचा आधार, सिंधुदुर्ग विभागाला साडे अकरा लाखांचे उत्पन्नप्रवासी वाहतुकीतील नुकसान भरून काढण्याचे मोठे आव्हान

सुधीर राणेकणकवली : कोरोना परिस्थिती पूर्वपदावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीला आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. ही आर्थिक हानी भरून काढण्यासाठी माल वाहतुकीचा पर्याय एसटी महामंडळाने निवडला आहे.सध्यातरी त्याचाच आधार एसटीला असून सिंधुदुर्ग विभागाला मे महिन्यात माल वाहतुकीतून ११ लाख ५४ हजार ४३१ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी अलीकडे तोट्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्हा अंतर्गत तसेच आंतरराज्य वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग एसटी विभागाला रोजच्या २३ लाखाच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे एसटीच्या तोट्यात आणखीन भर पडत आहे. तसेच इतर बाबींबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम होत आहे.

सिंधुदुर्ग विभागातील २१०० कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन अद्याप झालेले नाही. वेतनाचा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्यामुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाने एसटीला आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे. त्याची दखल घेत ६०० कोटींचे अर्थसहाय्य राज्य शासनाने बुधवारी जाहीर केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला तरी वेतनाच्या समस्येवर कायम स्वरूपी तोडगा काढावा. तसेच एसटी फायद्यात येण्यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत आहे.एसटीच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी माल वाहतुकीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. सिंधुदुर्ग विभागानेही त्यावर अमंलबजावणी करीत हापूस आंबा वाहतूक तसेच वाळू, जांभा दगड , धान्य अशा विविध मालाची वाहतूक सुरू केली आहे. त्यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. या मालवाहतूक गाड्यांनी मे महिन्यात २४ हजार २४२ किलोमीटरचा प्रवास केला आहे.मे महिम्यातील उत्पन्न !

  • सावंतवाडी आगार २ लाख ३४ हजार रुपये -- ५२२२ किलोमीटर अंतराचा प्रवास.
  • कणकवली आगार १ लाख ४५ हजार ५०० रुपये - ३०५१ किलोमीटर अंतराचा प्रवास .
  • कुडाळ आगार २लाख १२ हजार ९०४ रुपये - ४८३७ किलोमीटर अंतराचा प्रवास .
  • देवगड आगार २ लाख ७० हजार ७४२रुपये - ५३२५ किलोमीटर अंतराचा प्रवास.
  • मालवण आगार १८ हजार ७००रुपये, ३२८ किलोमीटर अंतराचा प्रवास .
  • वेंगुर्ला आगार ५७ हजार ४२५रुपये , ११९०किलोमीटर अंतराचा प्रवास.
  • विजयदुर्ग आगार २ लाख १५ हजार १६० रुपये - ४२८९ किलोमीटर अंतराचा प्रवास .
टॅग्स :state transportएसटीkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग