शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग

By admin | Updated: August 4, 2015 23:46 IST

मोजणी पूर्णत्त्वाकडे : अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाहीचे आदेश

रत्नागिरी : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला असून, त्याअनुषंगाने मोजणीचे काम पूर्णत्त्वाकडे गेले आहे. भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या ३ अ अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आजच्या बैठकीत उपविभागीय कार्यालयांना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग चौपदीकरणासाठीच्या भूसंपादन प्रक्रियेला आता वेग आला आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मोजणीची प्रक्रिया पूर्णत्त्वाकडे गेली आहे. याचे सर्व नकाशे महसूल विभागाकडून तयार करण्यात आले आहेत. या नकाशांच्या प्रती काढून देण्याचे काम मोनार्च या खासगी कंपनीकडे देण्यात आले आहे. आता त्यापुढील कार्यवाही म्हणजे ३ अ अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही महत्त्वाची आहे. याची अंमलबजावणी त्वरित होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज सकाळी आयोजित केली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी विविध उपस्थित होते. यावेळी मोजणी प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. भूसंपादन प्रक्रियेसाठी हिस्सा क्रमांक, सर्व्हे नंबर, क्षेत्र, मोजणी पत्रक या गोष्टी सातबाराशी जुळतात की नाहीत, याची तपासणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून करावी लागणार आहे. या प्रक्रियेला विलंब न करता येत्या आठ ते दहा दिवसात पूर्ण करून ३ अ अधिसूचना प्रसिद्धीप्रक्रिया सुरू करावी, असे आदेश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा आणि चिपळूण या चार तालुक्यांमध्ये ३ अ प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्यात येणार आहे.जिल्ह्यात या चार तालुक्यांमधील ३ अ प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून हरकती मागविण्यात येणार असून, त्यावर सुनावणी झाल्यानंतर भूसंपादनाची अंतिम प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याकरिता ३ ड अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे मोजणीनंतर आता ३ अ अधिसूचना प्रसिद्धीच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आज उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या उपविभागीय कार्यालयांना सूचना.मोजणीची प्रक्रिया पूर्णत्त्वाकडे.सर्व नकाशे महसूल विभागाकडून तयार.नकाशाच्या प्रती काढण्याचे काम मोनार्च कंपनीकडे.