शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

पद्मभूषण राम सुतार पुरस्काराचा सोनाली पालव यांना बहुमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 3:09 PM

Kankavli culture Sindhdurug : शहरातील प्रसिद्ध शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांच्या द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२९ व्या वार्षिक कला प्रदर्शनात मांडलेल्या ' द शेफर्ड ' या व्यक्तीशिल्पाला प्रतिष्ठीत जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे .१५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . या बहुमानाबद्दल सोनाली पालव यांचे सिंधुदुर्गाच्या सांस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकणकवलीतील प्रसिद्ध शिल्पकार सोनाली पालव यांना पद्मभूषण राम सुतार पुरस्कार'द शेफर्ड ' व्यक्तीशिल्पाला बहुमान

सुधीर राणेकणकवली : शहरातील प्रसिद्ध शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांच्या द बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२९ व्या वार्षिक कला प्रदर्शनात मांडलेल्या ' द शेफर्ड ' या व्यक्तीशिल्पाला प्रतिष्ठीत जगविख्यात भारतीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार प्राप्त झाला आहे. १५ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . या बहुमानाबद्दल सोनाली पालव यांचे सिंधुदुर्गाच्यासांस्कृतिक चळवळीतून अभिनंदन करण्यात येत आहे.१२९ वर्षाची परंपरा असलेल्या बॉम्बे आर्ट सोसायटीच्या कला प्रदर्शनात स्थान मिळणे हे भारतीय चित्रकला आणि शिल्पकला क्षेत्रामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. येथे भारतभरातून आलेल्या शिल्पकारांची मोठी स्पर्धा असते . मात्र , कणकवलीसारख्या ग्रामीण भागातील सोनाली पालव यांच्यासारख्या युवा शिल्पकारांच्या ' द शेफर्ड 'या व्यक्तीशिल्पाला येथे स्थान मिळाले आहे . त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान आणखीनच उंचावली आहे.या शिल्पामुळे पद्मभूषण राम सुतार पुरस्काराच्या सोनाली या मानकरी ठरल्या आहेत . पद्मभूषण राम सुतार पुरस्कारासंदर्भात सोनाली म्हणाल्या 'द शेफर्ड ' हे शिल्प या पुरस्काराचे मानकरी ठरले आहे . आपली लोकजीवनकला विविधांगी आहे . त्या कलेला जोडून घेताना तळातील उपेक्षित वर्ग आणि त्यांचे जीवन आपल्याला कळते आणि त्या जीवनाचे वास्तव दर्शन आपल्याला होते . हेच वास्तव दर्शन मी माझ्या शिल्पकलेतून मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करते . ग्रामीण भागातील ' शेफर्ड लोकजीवनाचं शिल्प मी तयार केले आणि त्याला एवढे मोठे पारितोषिक मिळाले याचा मला आनंद होत आहे. सोनाली पालव याना यापूर्वीही शिल्पकलेसाठी अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

टॅग्स :cultureसांस्कृतिकKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग