Sit-in agitation on behalf of Congress in Kankavali; BJP govt protests! | कणकवलीत काँग्रेसच्यावतीने ठिय्या आंदोलन ; भाजपा सरकारचा निषेध !

कणकवली येथे काँग्रेसच्यावतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

ठळक मुद्देकणकवलीत काँग्रेसच्यावतीने ठिय्या आंदोलन ; भाजपा सरकारचा निषेध !महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कणकवली : उत्तरप्रदेश येथिल हाथरसमध्ये युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर त्या युवतीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसचे खासदार माजी अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. तर त्या पीडित युवतीवर पोलिसांनी रातोरात अंत्यसंस्कार केले. या घटनेच्या निषेधार्थ कणकवली तालुका काँग्रेस मार्फत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती दिवशीच केंद्रातील भाजपा सरकार व राजकीय दडपशाहीचा निषेध करण्यात आला .

तसेच केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी कृषी विषयक विधेयकाचाही यावेळी निषेध करण्यात आला .
कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात शुक्रवारी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच भाजपा सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले .

यावेळी केंद्रातील भाजप व उत्तरप्रदेश मधील योगी सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या . भाजपा सरकार देशात दडपशाही राबवत असून , महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे . विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे काम सरकारकडून केले जात असल्याचा आरोप कणकवली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी यावेळी केला .

हाथरस येथे युवतीवर अत्याचार झाला असताना हे प्रकरण सरकार दडपू पाहत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला . यावेळी काँग्रेसचे वैभववाडी तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर , निलेश मालंडकर , कणकवली तालुका सरचिटणीस प्रवीण वरूणकर , युवक तालुकाध्यक्ष निलेश तेली , संदीप कदम , अभिषेक मेस्त्री , संतोष टक्के आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Sit-in agitation on behalf of Congress in Kankavali; BJP govt protests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.